शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Lok Sabha polls 2019: उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोदींविरोधी लाट, पश्चिम बंगाल, तामिळनाडू निर्णायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 04:53 IST

लोकसभेच्या चाळीसपेक्षा जास्त जागा असलेल्या राज्यांमध्ये भाजप, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेत नाराजी आहे.

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : लोकसभेच्या चाळीसपेक्षा जास्त जागा असलेल्या राज्यांमध्ये भाजप, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेत नाराजी आहे. त्याचे परिणाम नजीकच्या काळात पाहायला मिळतील आणि देशात पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही, अशी भविष्यवाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव व खा. डी. राजा यांनी वर्तवली. दैनिक लोकमतच्या दिल्ली कार्यालयात त्यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार व पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या चाळीसपेक्षा जास्त जागा आहेत. यापैकी तामिळनाडू व पश्चिम बंगाल वगळता राज्यात भाजप सत्तेत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सामान्यांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसेल, असा विश्वास डी. राजा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे सूचक वक्तव्य करून डी. राजा यांनी कुणासोबत चर्चा सुरू आहे, हा प्रश्न टाळला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सकारात्मक बदल दिसत आहेत. समविचारी, घटक पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध अत्यंत सौहार्दाचे आहेत, असे खा. राजा म्हणाले. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांची राजकारणातील जबाबदारी वाढली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.>महाराष्ट्राचा ऋणानुबंधडी. राजा यांनी डावी चळवळ व महाराष्ट्राचा ऋणानुबंध सांगितला. रालोआच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रपती उमेदवारावर चर्चा सुरू होती. संपुआच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, डी. राजा व डाव्या पक्षाचे अन्य नेते बैठकीस उपस्थित होते.अनेक नावांची चर्चा झाल्यावर आता आपल्याला कुणा महिलेचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी विचार करायला हवा, असे डी. राजा यांनी सीताराम येचुरींना सांगितले. डॉ. मनमोहनसिंग यांनी सोनियांना प्रतिभाताई पाटील यांचे नाव सुचवले. शेजारी बसलेल्या कॉम्रेड ए.बी. वर्धन यांनी प्रतिभातार्इंचा संपूर्ण परिचय बैठकीत करून दिला.बर्धनांच्या मराठी कनेक्शनमुळे प्रतिभातार्इंचा जीवनपटच जणू आम्हा सर्वांना त्या वेळी कळाला, अशी आठवण राजा यांनी कथन केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९