शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:11 IST

रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

ठळक मुद्दे रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी मिळणार असून त्यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. आज राहुल गांधी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनोहर कुंभेजकर

नवी दिल्ली - रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी मिळणार असून त्यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. आज राहुल गांधी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम,मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील हे आज सकाळी उर्मिला मातोंडकर समवेत दिल्लीला गेले आहे.

काँग्रेस पक्षश्रेठींनी अभिनेत्री शिल्पा शिंदे, अभिनेत्री आश्विनी जोशी, अभिनेता कृष्णा अभिषेक आणि मुंबई काँग्रेसच्या चार्टर्ड अकाउंट सेलचे अध्यक्ष शेखर वैष्णव या  नावांना नकार दिला होता. तर निरुपम यांनी सुचवलेले माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. 

2004 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदला काँग्रेसने उत्तर मुंबईतून तिकीट दिले होते, त्यांनी उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. उर्मिला मातोंडकर यांनी 2016 मध्ये मोहसिन अख्तर यांच्याशी विवाह केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा 4 लाख 46 हजार मतांनी पराभव केला होता. 

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरcongressकाँग्रेसdelhiदिल्ली