शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक 2019: मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं, मतदान प्रक्रिया खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:27 IST

देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे.

पाटणाः देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. बिहारमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. सारण लोकसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारण लोकसभा निवडणुकींतर्गत सोनपूर विधानसभेच्या नयागावातील 131 नंबर मतदान केंद्रावर ही ईव्हीएम मशिन फोडल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती. या प्रकरणी रणजित पासवान याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकारानंतर नयागावातील मतदान केंद्र संख्या 131वरची मतदान प्रक्रिया खंडित करण्यात आली आहे. सारणच्या जागेवरून एनडीएचा सरळ सरळ महागठबंधनशी मुकाबला आहे. या जागेवरून लालूंचे नातेवाईक चंद्रिका राय महागठबंधनचे उमेदवार आहेत. तर एनडीएकडून राजीव प्रताप रुडी रिंगणात आहेत. बिहारमधल्या पाच लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहेत.

सीतामढी, मधुबनी, मुजफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर(सु) हे मतदारसंघ 82 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला करणार आहेत. या पाचव्या टप्प्यात सारणमधून भाजपाचे राजीव प्रताप रुडी आणि आरजेडीचे चंद्रिका राय, हाजीपूरमधले आरजेडीचे शिवचंद्र राम, एलजेपीचे पशुपती कुमार पारस, मधुबनीच्या व्हीआयपीचे बद्री पूर्वे, अपक्ष शकील अहमद, मुजफ्फरपूरमधले बीएसपीच्या स्वर्णलता देवी आणि भाजपाच्या अजय निषाद, सीतामढीतले जेडीयूचे सुनील कुमार पिंटू, आरजेडीचे अर्जुन राय यांच्यासह प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019