शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 06:19 IST

एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित १८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी १९ आणि २६ एप्रिल, ७, १३ आणि २० मे अशा पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश,  ओडिशा,  सिक्कीम व अरुणाचल प्रदेश या ४  राज्यांच्या विधानसभा आणि विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

निवडणुकीची वैशिष्ट्ये

  • सुमारे ८३ दिवस निवडणूक प्रक्रिया पार पडेल. ही आजवरची सर्वांत मोठी निवडणूक प्रक्रिया असणार आहे.
  • कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आऊटर मणिपूर मतदारसंघात दोन टप्प्यांत मतदान होईल.
  • यंदा तब्बल १.८२ काेटी नवमतदार प्रथमच मतदान करतील.
  • मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग व गर्भवती महिला मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, मदत केंद्र. 
  •  

 

  • टप्पा १ - ५ मतदारसंघ - १९ एप्रिल (कंसात २०१९चा विजयी पक्ष)

नागपूर (भाजप), रामटेक (शिवसेना), भंडारा-गोंदिया (भाजप), गडचिरोली-चिमूर(भाजप) आणि चंद्रपूर (काँग्रेस). / भाजप - ३, शिवसेना - १, काँग्रेस - १

  • टप्पा २ - ८ मतदारसंघ - २६ एप्रिल

बुलढाणा (शिवसेना), अकोला (भाजप), अमरावती (अपक्ष), वर्धा (भाजप), यवतमाळ-वाशीम (शिवसेना), हिंगोली (शिवसेना), नांदेड (भाजप) आणि परभणी (शिवसेना). / भाजप - ३, शिवसेना - ४, अपक्ष - १

  • टप्पा ३ - ११ मतदारसंघ - ७ मे

बारामती (राष्ट्रवादी), सोलापूर(भाजप), माढा (भाजप), सांगली(भाजप), सातारा (राष्ट्रवादी), कोल्हापूर (शिवसेना), हातकणंगले (शिवसेना), रायगड (राष्ट्रवादी), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (शिवसेना), उस्मानाबाद (शिवसेना) आणि लातूर (भाजप). / भाजप - ४, शिवसेना - ४, राष्ट्रवादी - ३

  • टप्पा ४ - ११ मतदारसंघ - १३ मे

नंदूरबार (भाजप), जळगाव (भाजप), रावेर (भाजप), जालना (भाजप), औरंगाबाद (एआयएमआयएम), मावळ (शिवसेना), पुणे (भाजप), शिरुर (राष्ट्रवादी), अहमदनगर (भाजप), शिर्डी (शिवसेना) आणि बीड (भाजप). / भाजप - ७, शिवसेना - २, राष्ट्रवादी - १, एआयएमआयएम - १

  • टप्पा ५ - १३ मतदारसंघ - २० मे

धुळे (भाजप), दिंडोरी (भाजप), नाशिक (शिवसेना), पालघर (शिवसेना), भिवंडी (भाजप), कल्याण (शिवसेना), ठाणे (शिवसेना), उत्तर मुंबई (भाजप), उत्तर-पश्चिम मुंबई (शिवसेना), उत्तर-पूर्व मुंबई (भाजप), उत्तर-मध्य मुंबई (भाजप), दक्षिण-मध्य मुंबई (शिवसेना) आणि दक्षिण मुंबई (शिवसेना). / भाजप - ६, शिवसेना - ७

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकVotingमतदानthaneठाणेMumbaiमुंबईRaigadरायगड