शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून त्यांनी बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 13:47 IST

दु:खाचा डोंगर कोसळूनही मतदान करण्यास आलेल्या मुलाचं सोशल मीडियावर कौतुक

छतरपूर: मध्य प्रदेशातल्या छतरपूरमध्ये आज मतदान सुरू आहे. यावेळी एका मतदारानं सर्वांचं लक्ष वेधलं. वडिलांचे अंत्यसंस्कार आटपून मतदान करण्यासाठी आलेल्या या व्यक्तीचं सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. पांढरा पंचा नेसून, डोक्यावरचे केस काढून ही व्यक्ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली. त्यांना पाहून मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदारांना आश्चर्याचा धक्का बसला.मध्य प्रदेशातल्या लोकसभेच्या 7 जागांवर आज मतदान सुरू आहे. यात तिकमगढ, दामोह, खजुराहो, सतना, रेवा, होशांगबाद, बेतुल या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील खजुराहो मतदारसंघातल्या छतरपूरमधील मतदान केंद्रावर सकाळी एक व्यक्ती मतदानाला पोहोचली. पांढरा पंचा नेसून ही व्यक्ती मतदान करण्यासाठी रांगेत उभी होती. वडिलांचा अंत्यनिधी पार पाडून तातडीनं या व्यक्तीनं मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी अनेकजण असंख्य कारणं देत असताना वडिलांच्या निधनानंतरही मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या व्यक्तीचं सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. याआधी झारखंडमधल्या हजारीबागमध्ये एका 105 वर्षीय महिलेनं मतदान केलं. ही महिला तिच्या मुलासह मतदान केंद्रावर आली होती. त्यांचा मुलगा खांद्यावरुन त्यांना घेऊन आला होता. वयाच्या 105 व्या वर्षीदेखील मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या महिलेला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. आज देशात पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. सात राज्यांमधील 51 जागांवर आज मतदान होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, जयंत सिन्हा, राज्यवर्धन सिंह राठोड यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019khajuraho-pcखजुराहोVotingमतदान