शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आज देश रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'च्या मार्गाने चालत आहे- पीएम नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 19:20 IST

'आज संपूर्ण जग भारताबद्दल अतिशय आशावादी.'

राजमुंदरी(आंध्र प्रदेश)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी(दि.6) आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेस (YSR Congress party) पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. आंध्र प्रदेशातील जनतेने वायएसआर काँग्रेस पक्षाला पूर्णपणे नाकारले असल्याची टीका त्यांनी केली.

पीएम मोदी पुढे म्हणाले की, जनतेने वायएसआर काँग्रेसला पाच वर्षे दिली होती, पण त्यांनी ती अतिशय वाईटरित्या वाया घालवली. राज्य सरकारमुळेच आंध्र प्रदेश मागासलेपणाच्या जाळ्यात अडकला आहे. तिकडे झारखंडमध्ये ईडीने छापेमारीत काँग्रेस नेत्याच्या नोकराच्या घरातून नोटांचा ढिग जप्त केला. यापूर्वीही काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरातून चलनी नोटांचा डोंगर सापडला होता.  इतक्या नोटा होत्या की त्या मोजताना मशीनही बंद पडली. ज्यांच्याकडे नोटांचे डोंगर सापडतात, त्यांची काँग्रेसच्या पहिल्या घराण्याशी जवळीक असते. काँग्रेस नेत्यांनी निकालापूर्वीच पराभव स्वीकारला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

जग भारताबद्दल आशावादी... पीएम मोदी पुढे म्हणाले की, आज भारत 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' या अद्भुत मार्गावर चालत आहे आणि वेगाने विकसित होत आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जग भारताबद्दल अतिशय आशावादी आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४andhra pradesh lok sabha election 2024आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस