शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहतील; 'तुफानी' विजयानंतर नरेंद्र मोदींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 21:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून मिळवलेल्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून मिळवलेल्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं आहे. मोदी म्हणाले, नव्या भारतासाठी हा जनादेश मिळाला आहे. देशाच्या कोटी कोटी नागरिकांनी या फकीरची झोळी भरली आहे. जगातली ही सर्वात मोठी घटना आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची अखंडता गरजेची आहे. आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहणार आहेत. त्यात एक गरीब असतील, तर दुसरी जात ही गरिबीतून मुक्त करणाऱ्यांसाठी काही ना काही योगदान देणाऱ्याची असेल, असंही मोदी म्हणाले आहेत. निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणांना लोकशाही व्यवस्था सृदृढ करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया शांततारीत्या राबवण्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 130 कोटी नागरिकांनी, जनता जनार्दनानं आम्हाला पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पुढे मोदी म्हणाले, स्वतः मेघराज या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी आले आहेत. या देशातील नागरिकांना मान झुकवून मी नमन करतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात बऱ्याच लोकसभा निवडणुका झाल्या, पण या वेळी सर्वाधिक मतदान झालं. भारतीय नागरिकांची लोकशाहीप्रति असलेली बांधिलकी यातून व्यक्त होत आहे. भगवान कृष्णासारखा देश उभा आहे. जनतेनं कृष्णासारखं उत्तर दिलं आहे. हा भारताचा विजय आहे. या निवडणुकीत जर कोणी विजयी झालं असेल तर तो भारत असेल. भाजपा संविधान आणि घटनेच्या संरचनेप्रति आम्ही कटिबद्ध आहोत.या निवडणुकीत अनेक चढ-उतार आले, पण आम्ही विनम्रता आणि आदर्शाचा त्याग केलेला नाही. ही निवडणूक कोणताही पक्ष लढत नव्हता, कोणताही उमेदवार लढत नव्हता, कोणताही नेता लढत नव्हता, तर ही निवडणूक देशाची जनता लढत होती. ही लोकशाही बळकट करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, त्यांच्याप्रति मी आभार व्यक्त करतो. आता राजकीय पंडितांना आपली विचारधारा बदलावी लागणार आहे. सध्या 21वं शतक सुरू असून, हा मोदींचा नव्हे, प्रामाणिकपणाचा विजय आहे. आम्ही कधीही मार्गावरून भरकटलो नाही.आदर्शांचा कधीही त्याग केलेला नाही. ना थांबलो, ना वाकलो अन् थकलोसुद्धा नाही. 2014 ते 2019मध्ये धर्मनिरपेक्षतेवर बोलणाऱ्यांचा आवाज बंद झाला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कोणताही पक्ष जनतेची दिशाभूल करू शकलेला नाही. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची अखंडता गरजेची आहे. 2024पूर्वीच देशाला प्रगतिपथावर न्यायचा निर्धारही मोदींनी बोलून दाखवला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा