शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पूर्व भारतात भाजपची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:12 IST

हिंदी भाषिक पट्ट्यात कमी होणाऱ्या संभाव्य जागा भरून काढण्यासाठी पूर्व भारतात जोरदार मुसंडी मारण्याची भारतीय जनता पार्टीने आताच्या लोकसभा निवडणुकीत आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचे निकालांवरून दिसते.

- अजित गोगटेहिंदी भाषिक पट्ट्यात कमी होणाऱ्या संभाव्य जागा भरून काढण्यासाठी पूर्व भारतात जोरदार मुसंडी मारण्याची भारतीय जनता पार्टीने आताच्या लोकसभा निवडणुकीत आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचे निकालांवरून दिसते. निकाल येण्याआधी अनेक दिवस हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपला चांगलाच फटका बसेल याची चर्चा सुरु होती. त्यामुळे या भरुन काढण्यासाठी भाजपकडून अन्य राज्यांमध्ये प्रचारात अधिक जोर लावला होता. परंतु तसे घडताना दिसले नाही.हिंदी भाषिक पट्ट्यातील जागांमध्ये अपेक्षेएवढ्या जागा कमी झाल्याच नाहीत. या जागा भाजपने ब-याचअंशी राखल्याच परंतु सोबत पूर्व भारतात गेल्या वेळेपेक्षा जास्त मिळवल्या. या यशामुळेच एकट्या भाजपने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळविले एवढेच नव्हे तर भाजपने ३०० जागांचा टप्पाही प्रथमच स्वबळावर गाठला.भाजपने सुरुवातीपासूनच पूर्वेकडील राज्यांमध्ये जागा कशा वाढतील, याकडे लक्ष पुरवले होते. परिणामी यावेळी प. बंगाल (१७), बिहार (१५) आणि ओडिशा व आसाम (प्रत्येकी सात) या पूर्वेकडील राज्यांमध्ये तब्बल ५६ जागा नव्यानेच जिंकल्या. तृणमूल काँग्रेससोबत सातही टप्प्यांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपने यावेळी लक्षणीय यश मिळविले. त्रिपुरातील दोनपैकी दोन व झारखंडमधील १४ पैकी ९ जागाही खिशात घातल्याने भाजपच्या पूर्वेकडील मुसंडीला आणखी बळ मिळाले.देशभरातील एकूण ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपैकी तब्बल १२ राज्यांमध्ये भाजपने सर्वच्या सर्व किंवा बहुसंख्य जागा जिंकल्या आहेत. गुजरात (२६), हरियाणा (१०), दिल्ली (सात), उत्तराखंड (पाच), मणिपूर व चंदिगढ ( प्रत्येकी एक) या राज्यांनी शतप्रतिशत भाजपच्या बाजूने कौल दिला. याखेरीज गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने सत्ता गमवाव्या लागलेल्या छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठा विजय मिळवून भाजपने पुन्हा घट्ट पाय रोवला.छत्तीसगढमध्ये ११ पैकी १०, झारखंडमध्ये १४पैकी ९, कर्नाटकमध्ये २८ पैकी २४, मध्य प्रदेशात २९ पैकी २८ व राजस्थानमध्ये २५पैकी २४ जागा जिंकून भाजपाने विरोधकांचा पुरता सफाया केला. गेल्या वेळी सर्वाधिक ७१ जागा जिंकून देणाºया उत्तर प्रदेशात मात्र या पक्षाला यावेळी तब्बल ११ जागा गमवाव्या लागल्या आहेत. भाजपचे राज्यातील सर्वच नेते दावा करीत होते की, उत्तर प्रदेशातील जागा ७१ पेक्षा वाढल्या नाहीत पण त्या कमी नक्कीच होणार नाहीत.एवढे मोठे यश मिळूनही कर्नाटक वगळता उर्वरित दक्षिण भारत व मणिपूर आणि त्रिपूरा वगळता बाकी ईशान्य भारतात मात्र मोदी लाटेचा म्हणावा असा प्रभाव दिसून आला नाही. तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, नागालँड, मिझोराम, मेघालय आणि सिक्कीममध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही.मिझोरम । मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर२००९ पासून मिझोराम या राज्यात असलेली एकमेव जागा ही काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र आता या जागेवर थेट सामना आहे तो आघाडीवर असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार सी लालरोसंगा आणि अपक्ष ललनग्लिोव हमर यांच्यात. त्यात सी लालरोसंगा हे सुमारे ९ हजार मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजपा उमेदवाराला २० हजार मतेच मिळवता आली. २००९ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सीएल रुआला निवडून आले होते.नागालँड । थोकेओंपुढे काँग्रेसने टेकले हातलोकसभेच्या एका जागेसाठी मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसच्या के.एल.चिशी यांनी ३३ हजार ५३० मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु ठेवली होती.मात्र ही वाटचाल एनडीपीपीचे (नॅशनालिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) खासदार थोकेओे येप्थॉमी यांनी रोखत १६३४४ मतांची आघाडी घेऊन धक्का दिला. गेल्यावेळी एनपीएचे (नागा पीपल्स फ्रंट) रेफ्यू रियो याठिकाणी निवडणूक आले होते.चिशी आणि येप्थॉमी यांच्यातील लढत चुरशी ठरली.सिक्किम । चामलिंग यांच्या वर्चस्वाला धक्कालोकसभेची एक आणि विधानसभेच्या ३२ जागांवर सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे (एसडीएफ) सर्वेसर्वा मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांना धक्का देणारा कल दिसून येत आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे (एसकेएम) इंद्रा सुब्बा यांनी (४६४११) मते घेत एसडीएफच्या डेक बहादूर कटवाल यांना (४० हजार ६१) मागे टाकले आहे.विधानसभेत एसकेएमने १७ तर एसडीएफने १४ जागा जिंकल्या आहेत.एसकेएम आणखी एका जागेवर आघाडीवर आहे.त्रिपुरा । भाजपला लोकसभेतही १०० टक्केत्रिपुरामध्ये गेल्यावर्षी विधानसभेत सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने लोकसभेच्याही दोन्ही जागा जिंकल्या आहेत. त्रिपुरा (पश्चिम) मध्ये प्रतिमा भौमिक तर त्रिपुरा (पूर्व)मध्ये भाजपच्याच रेवती त्रिपुरा यांनी आपला विजय निश्चित केला आहे. या दोन्ही मतदारसंघात कमळ प्रथमच फुलले असून त्रिपुराच्या जनतेने राजघराण्याच्या वारस महाराजकुमारी प्रज्ञा देवबर्मन यांनासुध्दा नाकारले आहे. गेल्या वेळी या दोन्ही मतदारसंघातून माकपचे खासदार होते.मणिपूर । कॉँग्रेसला दोन्ही मतदारसंघात मोठा धक्कामणिपूरमधील दोन्ही जागांवर काँग्रेसच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. इनर मणिपूरमध्ये भाजपचे डॉ.राजकुमार रंजन सिंह हे काँग्रेसच्या ओईनाम नबाकिशोर सिंह यांच्यापेक्षा पुढे आहेत. तर आऊटर मणिपूरमध्ये नागा पीपल्स फ्र्रंटचे लोफ्रो फेज हे जवळपास ८८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसºया क्रमांकावर भाजपचे उमेदवार हाऊलीम शोखोपाव आहेत. काँग्रेसचे उमेदवार के. जेम्स हे थेट तिसºया क्रमांकावर फेकले गेले आहेत. या दोन्ही मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसचे खासदार होते.मेघालय । अगाथा, व्हिन्सेट पाला यांची दमदार वाटचाल२०१४ च्या मोदी लाटेतही शिलाँगमध्ये आपले वर्चस्व दाखवणाºया काँग्रेसच्या व्हिन्सेट पाला यांनी २०१९ मध्ये पुन्हा एकदा या मतदारसंघात आपला दम दाखवून दिला. त्यांनी अडीच लाखांच्या मतांच्या फरकाने ते सायंकाळपर्यंत आघाडीवर आहेत. तुरा मतदारसंघात अगाथा संगमा यांनीही आपल्या पित्याचा वारसा कायम ठेवला. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. मुकुल संगमा यांच्यावर ६० हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली. या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार तिसºया क्रमांकावर आहेत.

अरुणाचल । भाजपने केंद्र आणि राज्य जिंकलेअरुणाचल पूर्वमधून भाजपाच्या तापीर गयो यांंनी काँग्रेसच्या लांग्चा वांग्लाट यांच्यावर ६७१७१ मतांची तर अरुणाचल पश्चिममधून भाजपच्या किरन रिजेजृू यांनी काँग्रेसच्या नबाम तुकींवर १२९५८५ मतांनी आघाडी घेतली आहे. तर विधानसभेच्या ६० पैकी २८ जागा मिळवित ३ जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपकडे पुन्हा एकदा सत्ता जाणार आहे. मध्यरात्रीपर्यंत काँग्रेसने २, जनता दल (युनाटेड) ७ तर जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnorth eastईशान्य भारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९