शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 08:44 IST

Lok Sabha Election Result 2024 : सोनिया गांधी उत्तर द्या, ऐका सोनिया... एकेरी उल्लेखाने दुखावली होती मुले

- आदेश रावलनवी दिल्ली : एका पत्रकाराने प्रियांका गांधींना प्रश्न विचारला होता की, प्रवीण तोगडिया हे सोनिया गांधी या परदेशी वंशाच्या महिला आहेत, असे म्हणत आहेत. तुम्हाला काय म्हणायचे आहे? प्रियांका गांधी त्यावेळी म्हणाल्या होत्या, कोण आहेत प्रवीण तोगडिया? मी ओळखत नाही. यावेळी अमेठीतही असेच घडले. प्रियांका यांनी कधीही स्मृती इराणींचे नाव घेतले नाही. खरेतर यामागची कहानी जाणून घेणे आवश्यक आहे. एके दिवशी संसदेत स्मृती इराणी यांनी असे शब्द वापरले, ज्यामुळे आईच्या मुलांचे मन दुखावले. स्मृती इराणी संसदेत म्हणाल्या होत्या, ‘सोनिया गांधी, सोनिया गांधी उत्तर द्या, ऐका सोनिया.’ 

इराणी यांच्या या भाषेची संसद आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. एका पक्षाच्या वयाने ज्येष्ठ अध्यक्षांविरुद्ध, यूपीएच्या एका नेत्याविरुद्ध आणि एका महिलेने दुसऱ्या महिलेविरुद्ध, अशी भाषा वापरायला नको होती. अर्थातच ही गोष्ट सोनिया गांधींच्या मुलांच्या मनात घर करून गेली हे कोणाच्याही लक्षात आले नाही.  ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. अमेठी आणि रायबरेलीमधून कोण निवडणूक लढवणार हे शेवटपर्यंत गूढच बनलेले होते. 

शर्मा यांची उमेदवारी कशी ठरली?राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षांसह आई सोनिया गांधी यांचा सल्लाही मान्य करावा लागला की, रायबरेलीची जागा लढवावी, कारण ती जागा अध्यक्षांची आहे आणि राहुल गांधी माजी अध्यक्ष आहेत. अमेठीची जागा ठरविण्याची वेळ आली, तेव्हा निष्ठावंत आणि पक्षाचे छोटे कार्यकर्ते किशोरीलाल शर्मा यांनाच उमेदवारी द्यायची ठरले.

कोणता संदेश द्यायचा होता?एका छोट्या कार्यकर्त्याने स्मृती इराणींचा निवडणुकीत पराभव केला, असा संदेश गांधी कुटुंबाला द्यायचा होता.सोनिया गांधींच्या दोन्ही मुलांना ‘ऐका सोनिया, सोनिया उत्तर द्या’ सगळे लक्षात होते. प्रियांका गांधींनी अमेठी आणि रायबरेलीत ठाण मांडून दोन्ही जागा जिंकून आणल्या. पण, त्यांनी एकदाही स्मृती इराणींचे नाव घेतले नाही, जणू काही त्या त्यांना माहीतच नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालSmriti Iraniस्मृती इराणीamethi-pcअमेठी