शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : महानगरांत ‘रालोआ’ची दमदार कामगिरी, ग्रामीण भागात इंडिया आघाडीचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 06:36 IST

Lok Sabha Election Result 2024 : मुंबईने रोखली भाजपची घोडदौड; युतीची अनेक मतदारसंघांत आघाडी

Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) लोकसभा निवडणुकांत महानगरांत आपले सामर्थ्य दाखवले असून दिल्ली, बंगळुरू आणि पुणे यांसारख्या शहरी भागांत पुरेशी आघाडी मिळवली आहे. तथापि, महानगरांतील भाजपची ही घोडदौड मुंबईने रोखली. दुसरीकडे इंडिया आघाडीने ग्रामीण भागात आपली ताकद दाखवली असून, तेथील बहुतांश  मते मिळवली आहेत. 

दिल्लीत भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे असून, पक्षाचे उमेदवार शहरातील सातही मतदारसंघांत आघाडीवर आहेत. बंगळुरूतही हेच चित्र आहे. तेथील शहरी मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाजप उमेदवारांच्या पारड्यात मते टाकली आहेत. पुण्यातही ‘रालोआ’साठी अनुकूल वातावरण पाहावयास मिळाले. तेथे युतीने शहरातील अनेक मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे. यातून शहरी मतदारांतील भाजपची  लोकप्रियता दिसून येते. याउलट, विविध विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियाचा ग्रामीण भागांत दबदबा दिसून आला.

छत्तीसगडमधील कोरबा आणि उत्तर प्रदेशातील आंवला, बस्ती, लालगंज यांसारख्या भागात इंडियाला लक्षणीय पाठिंबा मिळाला. यावरून शेतकरी वर्ग आणि ग्रामीण मतदारांवरील इंडिया आघाडीची पकड अधोरेखित होते. तथापि, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारखी राज्ये याला अपवाद आहेत. तेथे ‘रालाेआ’ने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत जवळपास क्लीन स्वीप केले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल