शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:52 IST

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांचे जगातील विविध देशांतल्या ५० नेत्यांनी अभिनंदन केले आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत एनडीएला सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील तिसऱ्यांदा या पदावर विराजमान होणार असून त्यांचा या आठवड्यात शपथविधी होईल. लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांचे जगातील विविध देशांतल्या ५० नेत्यांनी अभिनंदन केले आहे. 

श्रीलंका, मालदीव, इराण, सेशेल्स या देशांचे राष्ट्राध्यक्ष व नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार, मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचे निवडणुकांतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी म्हटले आहे की,सिंगापूर, भारत यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याच्या घटनेस पुढच्या वर्षी ६० वर्षे पूर्ण होणार आहेत. 

मेलोनी म्हणाल्या...जी-२० गटातील देशांपैकी इटली, जपानचे पंतप्रधान, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी लोकसभा निवडणुकांतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केेले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, भारत व इटलीतील संबंध आणखी दृढ होण्याकरिता तसेच सहकार्य वाढण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. नायजेरिया, केनिया, कोमोरोस तसेच कॅरेबियन बेटे, जमैका, बार्बाडोस, गियाना या देशांनीही मोदींचे अभिनंदन केले.

बायडेन, सूनक, मॅक्रॉन यांनीही केले अभिनंदनअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. बायडेन यांनी म्हटले आहे की, भारतामधील ऐतिहासिक लोकसभा निवडणुकांत सुमारे ६५ कोटी लोकांनी मतदान केले. अमेरिका व भारतामध्ये घनिष्ठ मैत्री असून भविष्यात दोन्ही देशांतील सहकार्यात आणखी वाढ होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. सूनक यांनी म्हटले आहे की, ब्रिटन व भारतातील मैत्री भावी काळात वृद्धिंगत होणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल