शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन, मित्रपक्षांचे पाठिंब्याचे पत्र; जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 06:31 IST

Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती.

- संजय शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. दिल्लीत बुधवारी झालेल्या या बैठकीत तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्यासह सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचे पत्र सादर केले. त्यामुळे निकालानंतर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत या प्रस्तावावर सर्व पक्षांनी आपली सहमती नोंदविली. 

नितीश कुमार यांनी एनडीएने सरकार स्थापनेचा तातडीने दावा करण्याची मागणी केली, तर चंद्राबाबू नायडू यांनीही त्यास उशीर करू नये, असेही मत व्यक्त केले. दरम्यान, या बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत नायडू यांनी लोकसभाध्यक्षपदासह तीन महत्त्वाच्या खात्यांची मागणी केल्याचे समजते.

शुक्रवारी राष्ट्रपतींकडे दावा; शनिवारी शपथविधी?एनडीएच्या सर्व खासदारांची शुक्रवार, ७ जून रोजी दुपारी २ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात येईल. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीनंतर एनडीएचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर शनिवारी, ८ जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे.

राष्ट्रपतींकडून लोकसभा विसर्जित, मोदींचा राजीनामाकेंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना १७ वी लोकसभा तातडीने विसर्जित केली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत केंद्रीय मंत्रिमंडळासह पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला, तरी नव्या सरकारने कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळांने आपली सेवा बजावावी अशी सूचना केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल