शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : एक्झिट पोल्स पुन्हा फेल, वर्तविलेल्या अंदाजांच्या सरासरीजवळही फिरकले नाहीत प्रत्यक्ष निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 08:14 IST

Lok Sabha Election Result 2024 : काही एक्झिट पोल्सनी रालोआ या आघाडीला ४०० हून अधिक जागा दिल्या.

नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेतील अखेरच्या टप्प्याचे मतदान एक जूनला पार पडले आणि अवघ्या अर्ध्या तासात सर्व प्रमुख वाहिन्यांचे ‘एक्झिट पोल्स’ आले. या एक्झिट पोल्सचे वैशिष्ट्य असे की, या सर्व पोल्सनी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५०हून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले. काही एक्झिट पोल्सनी रालोआ या आघाडीला ४०० हून अधिक जागा दिल्या.

मावळते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अबकी बार चारशेपार’ असा नारा दिलेला होताच. तसेच प्रशांत किशोर यांच्यासारख्या राजकीय रणनीतीकारानेही भाजपला २०१९ च्या लोकसभेत मिळालेल्या जागांहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला. मावळते गृहमंत्री अमित शहा यांनीही साडेतीनशेहून अधिक जागा मिळतील, असा दावा केला.

त्या पार्श्वभूमीवर ‘एक्झिट पोल्स’चे आकडे जाहीर झाले. सर्व ‘एक्झिट पोल्स’ने एनडीएला दिलेल्या जागांची सरासरी होती ३६५, तर इंडिया आघाडीला मिळणा-या जागांची सरासरी होती १४६. पूर्णपणे एकतर्फी सामना असल्यासारखे चित्र एक्झिट पोल्सने रंगवले होते. 

एक्झिट पाेल नेमके कशासाठी केले हाेते जाहीर?या एक्झिट पोल्सचा परिणाम म्हणून सोमवारी शेअर बाजाराने उसळी मारली. शेअर मार्केटने नवा विक्रम रचला; मात्र सर्वसामान्य जनतेचा एक्झिट पोल्सवर विश्वास नव्हता. विशेषतः महाराष्ट्रातील सर्व एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कल नोंदवला होता. प्रत्यक्षात ‘महाविकास’च्या बाजूने जनतेने कौल दिला. 

एक्झिट पोल्स करताना पद्धतीशास्त्रीय चुका होत्या. संशोधनाची शिस्त नव्हती. जनतेशी संपर्क नव्हता. ‘सॅम्पल साइझ’ची पारदर्शकता नव्हती. मतदानाची जी आकडेवारी नंतर वाढली, त्याची नोंद नव्हती. अखेरच्या टप्प्याकडे लक्ष नव्हते. हे ‘एक्झिट पोल’ अशास्त्रीय होते आणि म्हणूनच ते ठार चुकीचे ठरले.

केवळ शेअर बाजारात उलाढाल व्हावी आणि टीआरपी मिळावा, यासाठी हे एक्झिट पोल्स जाहीर केले गेले होते का, असा सवाल आता विचारला जाता आहे. इथून पुढे ‘एक्झिट पोल्स’नी एक्झिट घ्यावी, असे हे प्रकरण आहे.

एक्झिट पोल्स किती टक्के ठरले खरे?    संस्था    एनडीए    इंडिया    इतर    टक्के    इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया    ३६१-४०१    १३१-१६६    ८-२०    ७०.५०%    एबीपी-सीव्होटर    ३५३-३८३    १५२-१८२    ४-१२    ७६.००%    टीव्ही-९-पोलस्ट्रॅट    ३४२    १६६    ३५    ७८.५०%    इंडिया टीव्ही- सीएनएक्स    ३७१-४०१    १०९-१३९    २८-३८    ६४.५०%    एनडीटीव्ही- जन की बात    ३६२-३९२    १४१-१६१    १०-२०    ७१.००%    इंडिया न्यूज डी-डायनामिक्स     ३७१    १२५    ४७    ६६.५०%    रिपब्लिक टीव्ही - पीएमएआरक्यू    ३५९    १५४    ३०    ७४.००%    रिपब्लिक भारत - मॅट्रिझ    ३५३-३६८    ११८-१३३    ४३-४८    ६७.५०%    न्यूज-२४ टुडेज चाणक्य    ४००    १०७    ३६    ६७.५०%    पोल ऑफ पोल    ३६५    १४६    ३२    ७१.५०%    एआय एक्झिट पोल    ३०५ ते ३१५     १८० ते १९५     ३८ ते ५२     ८७.५०%    प्रत्यक्ष निकाल    २९३    २३३    १७    

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल