शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
3
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
4
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
5
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
6
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
7
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
9
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
10
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
11
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
12
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
13
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
14
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
15
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
16
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
17
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
18
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
19
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
20
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक २०२४: 'या' ५ ठिकाणी मतांचे अंतर सर्वात कमी, पाहा Top 5 निसटते विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 14:22 IST

Top 5 candidates with lowest victory margin, Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालात ५ मतदारसंघात दिसून आली 'काँटे की टक्कर'

Top 5 candidates with lowest victory margin, Lok Sabha Election Result 2024: देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागला. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या काही महिन्यांपासून ४०० पारचा दावा केला होता. तो सपशेल फोल ठरल्याचे दिसून आले. भारताच्या जनतेने भाजपप्रणित एनडीएला २९२ जागा दिल्या. त्यापैकी भाजपाला २४० जागांसह भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. तर काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला. पण इंडिया आघाडीला मात्र अपेक्षेपेक्षा दणदणीत यश मिळवता आले. त्यांना २३२ जागा मिळवण्यात यश आले. अनेक ठिकाणी थोड्या फरकाने उमेदवार विजयी झाले. पाहू Top 5 'काँटे की टक्कर'

१. महाराष्ट्रात, एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात कमी फरकाने विजय मिळवला. त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून वायकर यांना ४,५२,६४४ मते मिळाली, तर कीर्तिकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली.

२. केरळमध्ये अटिंगल मतदारसंघात आणखी एक सर्वात कमी फरक दिसला. येथे काँग्रेसचा उमेदवार ६८४ मतांनी विजयी झाला. काँग्रेसचे उमेदवार अधिवक्ता अदूर प्रकाश यांना ३,२८,०५१ मते मिळाली. तर CPI(M) उमेदवार व्ही जॉय यांना ३,२७,३६७ मते मिळाली.

३. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या अजेंद्र लोधी यांनी हमीरपूर मतदारसंघात कमी म्हणजे २,६२९ मतांनी विजय मिळवला. लोधी यांना ४,९०,६८३ मते मिळाली, तर भाजपाचे उमेदवार कुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल यांना ४,८८,०५४ मते मिळाली.

४. सर्वात कमी फरकाने विजय मिळण्यामध्ये यूपीमधील आणखी एक मतदारसंघ सलेमपूर आहे. तिथे सपा उमेदवार रमाशंकर राजभर यांनी भाजपाच्या रवींद्र कुशावाह यांच्यावर ३,५७३ मतांनी विजय मिळवला. राजभर यांना ४,०५,४७२ मते मिळाली, तर कुशावाह यांना ४,०१,८९९ मते मिळाली.

५. महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा ३,८३१ मतांनी विजय झाला. शोभा बच्छाव यांना ५,८३,८६६ इतकी मते मिळाली. तर भाजपाच्या सुभाष भामरे यांना ५,८०,०३५ मते मिळाली.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ravindra Waikarरवींद्र वायकरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४amol kirtikarअमोल कीर्तिकर