नवी दिल्ली- भारतात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीलाही काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पूर्ण जगाचं लक्ष भारतातल्या लोकसभा निवडणुकांवर राहणार आहे. अशात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं एक खळबळजनक दावा केला आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला आहे.अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला आहे. जो सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे. रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं.
कट्टरतेवर उतरली भाजपा, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 12:57 IST
भारतात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
कट्टरतेवर उतरली भाजपा, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा
ठळक मुद्देभाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील... अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला आहे.मोदींच्या कार्यकाळात भाजपाशासित राज्यांमध्ये सांप्रदायिक वाद विकोपाला केला आहे.