शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वांत खर्चीक ठरणार यंदाची लोकसभा निवडणूक; अमेरिकेलाही टाकणार मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 05:42 IST

२० टक्के खर्च आयाेग करणार, निवडणुकीच्या खर्चात राजकीय पक्ष, संस्था, उमेदवार, सरकार तसेच निवडणूक आयाेगातर्फे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे.

काेलकाता : काेणतीही निवडणूक म्हटली की खर्च येताेच. यावेळची लाेकसभा निवडणूक जगातील सर्वांत खर्चीक निवडणूक ठरणार आहे. यंदा सुमारे १.३५ लाख काेटी रुपये खर्च हाेण्याचा अंदाज एका संस्थेने वर्तविला आहे. 

निवडणुकींमध्ये हाेणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवून असलेल्या ‘सेंटर फाॅर मीडिया स्टडीज’ या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. निवडणुकीच्या खर्चात राजकीय पक्ष, संस्था, उमेदवार, सरकार तसेच निवडणूक आयाेगातर्फे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. संस्थेने म्हटले की, यावर्षी डिजिटल प्रचार जास्त हाेत आहे. राजकीय पक्ष कॉर्पाेरेटप्रमाणे काम करीत असून व्यावसायिक संस्थांच्या सेवा घेत आहेत.

सरकारचा खर्च किती?संस्थेने यापूर्वी सुमारे १.२० लाख काेटी रुपये यंदाच्या निवडणुकीत खर्च हाेतील, असा अंदाज व्यक्त केला हाेता. ताे आता वाढविला आहे. यापैकी २० टक्के खर्च निवडणूक आयाेग करणार आहे. इतर खर्च हा राजकीय पक्ष व उमेदवारांकडून हाेण्याचा अंदाज आहे.

१,४०० रुपये प्रति मतदार खर्चाचा अंदाज.१.२ लाख काेटी रुपये २०२०मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत खर्च६,५०० काेटी रुपये निवडणूक आयाेगाने गेल्या लाेकसभा निवडणुकीत खर्च केल्याचा अंदाज आहे.१,५०० काेटी रुपये गेल्या लाेकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्रसिद्धीवर खर्च केले हाेते. १,२२३ काेटी रुपयांपेक्षा जास्त खर्च प्रमुख सात राष्ट्रीय पक्षांनी केला हाेता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग