शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मॅच फिक्सिंग करून निवडणूक जिंकण्याचा हाेताेय प्रयत्न, इंडिया आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:25 IST

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा  प्रयत्न करीत असल्याचे सारा देश आणि भाजपचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा  प्रयत्न करीत असल्याचे सारा देश आणि भाजपचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयोगातील दोन पंचही त्यांनीच निवडले. सामना सुरु होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकले. ही मॅच फिक्सिंग मोदी आणि भारतातील तीनचार सर्वात मोठे उद्योगपती करीत आहेत, अशी टीका काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. 

‘इंडिया’ आघाडीच्या जाहीर सभेत राहुल गांधी बाेलत हाेते. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले, मॅच फिक्स करून चारशे जागा जिंकताच आम्ही संविधान बदलू, असे भाजपच्या एका खासदाराने म्हटले. ही लढाई संविधान वाचविण्याची आहे.ही निवडणूक सामान्य नाही. हिंदुस्थान, संविधान, गरीब, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासींचे हक्क वाचविण्याची निवडणूक आहे. ज्या दिवशी संविधान संपेल त्या दिवशी हिंदुस्थान वाचणार नाही. तेच त्यांचे लक्ष्य आहे. मॅच फिक्सिंगची निवडणूक जिंकून भाजपने संविधान बदलले तर संपूर्ण देशात आगडोंब उसळेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

केजरीवाल यांच्यासहा गॅरंटीपूर्ण देशात २४ तास वीजपुरवठा, संपूर्ण देशात गरीबांना वीज मोफत, प्रत्येक गावात आणि मोहल्ल्यात शानदार सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनीक, प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी सरकारी इस्पितळे, शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार भाव, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा.. अशा अरविंद केजरीवाल यांच्या सहा गॅरंटी त्यांच्या पत्नी सुनीता यांनी राजकीय व्यासपीठावर प्रथमच पदार्पण करताना वाचून दाखविल्या.

विरोधकांनी डागली टीकेची तोफमल्लिकार्जुन खरगे - देशात लोकशाही हवी की हुकुमशाही? लोकशाहीच्या, संविधानाच्या देशाच्या रक्षणासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन, मतभेद विसरुन निवडणूक लढली पाहिजे.अखिलेश यादव -  भाजप हा ब्रह्मांडातील सर्वात खोटारडा पक्ष आहे. निर्वाचित मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठविल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभर भाजपची छी थू होत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करुन सत्ता वाचविण्याचा प्रयत्न केल्यास चारसौ पार नाही तर चार सौ से हार निश्चित आहे.शरद पवार -  केजरीवाल आणि सोरेन यांना करण्यात आलेली अटक ही लोकशाही आणि संविधानावर झालेला हल्ला आहे.तेजस्वी यादव -  अब की बार चारसौ पार ची घोषणा ऐकून असे वाटत आहे की आधीपासूनच ईव्हीेएम सेटिंग झाली आहे.   सीताराम येचुरी -  याच मैदानातून ४७ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य की गुलामी असा नारा देण्यात आला होता. आज त्याची पुनरावृत्ती होत आहे भगवंत मान -  हम वो पत्ते नाही जो शाख से गिर जायेंगे, आँधीओ को कह दो अपनी औकात रहेकल्पना सोरेन -   भाजपच्या हुकुमशाहीविरुद्ध लढणार आणि जिंकणार.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधी