शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 06:05 IST

Indresh Kumar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून (Lok Sabha Election 2024 Result ) भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने (RSS) भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे. ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे सत्तेबाहेर बसले आहेत, असं विधान इंद्रेश कुमार यांनी केलं आहे. याआधीच्या वक्तव्यावरून खूप वाद झाल्यानंतर इंद्रेश कुमार म्हणाले की, सध्या देशातील वातावरण खूप स्पष्ट आहे. ज्यांनी रामाला विरोध केला ते सत्तेबाहेर आहेत आणि ज्यांनी राम भक्तीचा संकल्प केला ते आज सत्तेत आहेत. तसेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश चौफेर प्रगती करेल, असा विश्वास जनमानसामध्ये निर्माण झालेला आहे. तसेच हा विश्वास असाच वृद्धिंगत व्हावा, अशा आम्ही शुभेच्छा देतो.दरम्यान, १३ जून रोजी कानोता येथे राम रथ अयोध्या यात्रा दर्शन पूजा समारंभाला संबोधिक करताना इंद्रेश कुमार भाजपाबाबत म्हणाले होते की,  ज्या पक्षाने श्री रामाची भक्ती केली, मात्र ते अहंकारी झाले. त्यांना २४१ वर रोखलं गेलं. मात्र त्यांना सर्वात मोठा पक्ष बनवण्यात आलं. त्यांना जो पूर्ण हक्क मिळाला पाहिजे होता. जी शक्ती मिळायला हवी होती, ती देवाने अहंकारामुळे दिली नाही. तर ज्यांची श्री रामावर कुठल्याही प्रकारची श्रद्धा नव्हती. त्यांना एकत्रितपणे २३४ जागांवर रोखले. सगळे एकत्र मिळूनही पहिलं स्थान मिळवू शकले नाहीत. दुसऱ्या स्थानावरच त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे देवाचा न्याच विचित्र नाही आहे, तर सत्य आहे, खूप आनंददायी आहे, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले होते. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावरून भाजपाला टोला लगावला होता. ते म्हणाले की, इंद्रेश कुमार हे संघाचे बडे नेते आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अहंकार आणि मणिपूरवरून भाष्य केलं होतं. भाजपाचे दोन बडे नेते अहंकारी झाले आहेत. आरएसएस आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. या लोकांना १० वर्षांमध्ये का रोखण्यात आलं नाही. संघाच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी ही विधानं का केली नाहीत, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी