शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 09:53 IST

Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Prashant Kishor ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान बाकी असून ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीए जिंकणार की इंडिया आघाडी जिंकणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार या चर्चा सुरू होत्या. या चर्चेदरम्यान प्रशांत किशोर संतापल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

नेमकं काय घडलं?

पत्रकार करण थापर आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात मुलाखतीदरम्यान वाद झाला. थापर यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना त्यांनीच केलेल्या ट्विटवर प्रश्न विचारला. प्रशांत किशोर यांनी ट्विटरवर मे 2022 आणि सप्टेंबर 2023 मध्ये हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामध्ये काँग्रेसच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती. मुलाखतीदरम्यान, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबद्दल यापूर्वी केलेल्या वक्तव्याचा इन्कार केला. यावेळी थापर यांनी त्यांना त्यांची भूतकाळातील विधाने सादर पुराव्यासहित दिली. यावेळी त्यांनी प्रशांत किशोर संतापल्याचे पाहायला मिळाले. 

या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या विजयाबाबत मोठं भाकित केलं. प्रशांत किशोर म्हणाले,भाजपा सध्याच्या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकू शकेल तर काँग्रेसला १०० जागा गाठणे कठीण जाईल. या भाकितानंतर करण थापर यांनी प्रशांत किशोर यांना त्यांच्या जुन्या ट्विटची आठवण करुन दिली. यावेळी प्रशांत किशोर यांनी असं कोणतही विधान मी केले नसल्याचे सांगितले, यावेळी थापर यांनी त्यांना ट्विटचे पुरावे दिले. यावेळी प्रशांत किशोर संतापल्याचे पाहायला मिळाले. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार

बिहारमधील जनसुराज पक्षाचे संयोजक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला. वेगवेगळ्या विचारसरणीचे दोन पक्ष निवडणूक लढवीत असताना काही भांडण होणार हे स्पष्ट आहे. परंतु, मूलभूतपणे मला असे काहीही दिसत नाही की, कोणतेही मोठे आश्चर्यकारक उलटफेर होईल. एनडीएचा आकडा कमी होणार आहे. मात्र, भाजपला ३०० हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. जे लोक म्हणतात की, भाजप हारत आहे, त्यांनी सांगावे की भाजप किती आणि कोणत्या जागा गमावत आहे.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024