शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 16:39 IST

Andhra Pradesh Lok Sabha Election 2024: आंध्र प्रदेशमध्ये आज विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या मतदानादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका मतदान केंद्रावर एका तरुणाला मारहाण करणं वायएसआर काँग्रेसच्या आमदाराला चांगलंच महागात पडलं.

आंध्र प्रदेशमध्ये आज विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या मतदानादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका मतदान केंद्रावर एका तरुणाला मारहाण करणं वायएसआर काँग्रेसच्या आमदाराला चांगलंच महागात पडलं. गुंटूरमधील एका मतदान केंद्रामध्ये रांगेत घुसण्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर कथितपणे एका मतदाराला मारहाण केली. त्यानंतर मारहाण झालेल्या तरुणानेही आमदारांना फटका दिला. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार ए. शिवकुमार हे मतदाराच्या दिशेने झेपावताना आणि त्याच्या तोंडावर हात उगारताना दिसत आहेत. त्यानंतर मतदारानेही आमदारांवर प्रत्युत्तरादाखल हात उगारला. त्यानंतर आमदारांचे समर्थकही मतदारावर तुटून पडल्याचे दिसत आहे.

दरम्यान, तिथे असलेल्या इतर मतदारांनी मध्ये पडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदारांचे कार्यकर्ते त्या मतदाराला बेदम मारहाण करत राहिले. आंध्र प्रदेशमध्ये आज लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ मतदारसंघांत आज मतदान होत आहे.  आंध्र प्रदेशमध्ये यावर्षी जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस विरुद्ध तेलुगू देसम आणि भाजपा यांची आघाडी यांच्यात मुख्य लढत होत आहे.   

टॅग्स :andhra pradesh lok sabha election 2024आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४