शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आप आवळा देऊन कोहळा काढण्याच्या तयारीत? काँग्रेसकडे दिल्लीच्या बदल्यात या राज्यांमध्ये केली जागांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 12:17 IST

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आता जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. सोमवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेऊन जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आता जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. सोमवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेऊन जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा केली. यावेळी दोन्ही पक्षांनी आपल्या आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या प्रमाणात भागीदारी देण्याचा प्रस्ताव ठेवला. याचवेळी आपने गुजरात, हरियाणा आणि गोव्यामध्ये जागा देण्याची मागणी केली. मात्र सध्या दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही समाधानकारक फॉर्म्युला निघालेला नाही. म्हणजेच दोन्ही

पक्षातील नेते, पुन्हा चर्चा करणार आहेत. तसेच जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या नॅशनल अलायन्स समितीचे  प्रमुख मुकुल वासनिक, अशोक गहलोत यांच्यासह जागावाटप समितीचे सदस्य सहभागी झाले होते. तर आम आदमी पक्षाचं प्रतिनिधित्व खासदार संदीप पाठक,  आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांनी केलं. मात्र या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत कुठलीही माहिती प्रसारमाध्यमासमोर आलेली नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये कांग्रेसला लोकसभेच्या तीन जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.  

दिल्लीमध्ये लोकसभेच्या ७ जागा असून, २०१४ आणि २०१९ मध्ये दिल्लीतील सर्वच्या सर्व जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिल्लीमध्ये ५६ टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसला २२ आणि आम आदमी पक्षाला १८ टक्के मतं मिळाली होती. दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघामध्ये आप आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज ही भाजपाच्या उमेदावारांन मिळालेल्या मतांपेक्षा अधिक नव्हती. 

दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्ये आपने काँग्रेसला ६ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. म्हणजेच दिल्ली आणि पंजाबमध्ये आप काँग्रेससोबत जागावाटपामध्ये ५०-५० चा फॉर्म्युला वापरण्यास तयार आहे. मात्र यातही स्वत:ला मोठ्या भावाच्या रूपात ठेवण्याचा आपचा प्रयत्न असेल. याशिवाय आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये एक, हरियाणामध्ये तीन आणि गोव्यामध्ये एका जागेची मागणी केली आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा असून, मागच्या दोन निवडणुकांमध्ये येथे भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघातून चैतर वसावा यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.  

आतापर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढत आला आहे. दरम्यानच्या काळात दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची सत्ता आल्याने इंडिया आघाडीतील हे पक्ष या दोन राज्यांतील जागावाटपाबाबतच चर्चा करतील, अशी शक्यता होती. मात्र आम आदमी पक्षाने पंजाब आणि दिल्लीसह इतर राज्यांमधील जागावाटपाबाबत विचार करण्यास काँग्रेसला भाग पाडलं आहे. त्यामुळे आता आम आदमी पक्षाने दिलेल्या प्रस्तावावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे. 

दिल्ली आणि पंजाबमधील काँग्रेसची सत्ता खेचून घेताना आम आदमी पक्षाने गुजरात आणि गोव्यामध्येही काँग्रेसच्या व्होट बँकेला सुरुंग लावला आहे. मात्र आम आदमी पक्षाला सोबत न घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस जागावाटपात औदार्य दाखवू शकते. 

टॅग्स :AAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी