शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपूर्वी या राज्यात आपला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 16:32 IST

AAP News: भाजपाला आव्हान देण्याची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाला छत्तीसगडमध्ये मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे छत्तीसगडमधील प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.  राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये आनंद प्रकाश गिरी आणि रवींद्र सिंह यांच्याही नावाचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी आम आदमी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भाजपाला आव्हान देण्याची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाला छत्तीसगडमध्ये मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे छत्तीसगडमधील प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.  राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये आनंद प्रकाश गिरी आणि रवींद्र सिंह यांच्याही नावाचा समावेश आहे.

कोमल हुपेंडी यांच्यासोबत पक्षाच्या सहा सदस्यांनीही राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या मते सर्वजण पक्षावर नाराज आहेत. या नाराजीमागचं कारण आपचा इंडिया आघाडीमधील प्रवेश हे असल्याचं सांगितलं जात आहे. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी, प्रदेशउपाध्यक्ष  आनंद प्रकाश मिरी, प्रदेश सचिव  विशाल केळकर,  प्रदेशाध्यक्ष युथ विंग रवींद्र सिंह ठाकर,  प्रदेशाध्यक्ष एससी विंग धरम भार्गव, प्रदेशाध्यक्ष ओबीसी विंग कमलकांत साहू, प्रदेशाध्यक्ष एसटी विंग बसंत कुमार.

आम आदमी पक्षाने छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली होती. मात्र त्यांना एका जागेवरही कब्जा करता आला  नव्हता. या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांनी भानूप्रतापपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.  

टॅग्स :AAPआपChhattisgarhछत्तीसगडArvind Kejriwalअरविंद केजरीवाल