शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : अबकी बार भाजपा 300 तर एनडीए 400 पार - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 09:47 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.उत्तर प्रदेशमध्ये एकट्या भाजपला 74 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 

गोरखपूर - सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या मतदानाला रविवारी (19 मे) सुरुवात झाली आहे.  मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे 10 कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पक्षाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या मदतीने एनडीएला 400 जागा मिळतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महागठबंधनाचा फारसा परिणाम एनडीएच्या जागांवर पडणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये एकट्या भाजपाला 74 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 

मतदान करण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 'देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून गोरखपूर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. आपणही आळस न करता मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे' असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून केले आहे.

सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे. मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडेच असेल. राजकीय नेते त्यावर आपली मते व्यक्त करतील. पण 23 मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, त्यांचे नेते व प्रत्यक्ष उमेदवार यांच्या मनात प्रचंड धाकधूक असेल.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान