शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान आजोबांसह नातवाचाही झाला दारुण पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 22:01 IST

आज लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला आहे.

बंगळुरू - आज लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव धक्कादायक ठरला आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नातवालाही पराभव पत्करावा लागला आहे. नातवासोबतच एच. डी. देवेगौडा हेसुद्धा पराभूत झाले. जनता दल सेक्युलरचे नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमार स्वामी हे मांड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या ठिकाणी अपक्ष उमेदवार सुमालथा अम्बरिश यांचे त्यांच्यासमोर आव्हान होते. दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये सुमलथा अम्बरिश यांनी जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या अखेरीस सुमलथा अम्बरिश यांना 7 लाख  3 हजार 6660 मते मिळाली तर निखिल कुमारस्वामी यांना 5 लाख 77 हजार 784 मते मिळाली. अशाप्रकारे सुमलथा अम्बरिश यांनी 1 लाख 58 हजार 876 मतांनी विजय मिळवला. देवेगौडा कुटुंबीयांना आजचा दिवस पराभवाचा दुहेरी धक्का देणारा ठरला. मांड्या मतदारसंघातून निखिल कुमारस्वामी पराभूत झाले, तर एच. डी. देवेगौडा यांना  तुमकूर मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला. माजी पंतप्रदान एच. डी. देवेगौडा यांना अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपाच्या जी. एस. बसवराज यांनी पराभूत केले. 13 हजार 339 मतांनी बसवराज विजयी झाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Karnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019