शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पूर्वोत्तर भारतातही भाजपाची मुसंडी, 14 जागांवर घेतली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:42 IST

पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये भाजपा आणि आसाम गण परिषद 9 जागांवर आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देपूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये भाजपा आणि आसाम गण परिषद 9 जागांवर आघाडीवर आहेत. अरूणाचल प्रदेशमध्ये 2, मणिपूरमध्ये 1,  त्रिपुरामध्ये 2 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे.पूर्वोत्तर भारतातील 25 जागा भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहेत. 

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या राज्यांसोबतच पूर्वोत्तर भारतातील छोटी छोटी राज्येही चर्चेत राहिली. त्याला कारण ठरले ते म्हणजे गेल्या लोकसभा  निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या या भागावर केंद्रित केलेले लक्ष. काही वर्षांपूर्वी पूर्वोत्तर भारतात नाममात्र असलेल्या भाजपाने मागच्या पाच  वर्षांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाड्या करत अनेक राज्यांमध्ये सत्ता प्राप्त केली आहे. मात्र नागरिकत्व कायद्यामुळे या भागात भाजपाविरोधात नाराजी आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत लोकसभेच्या 25 जागा असलेल्या पूर्वोत्तर भाजपाला यश मिळते की या भागात बँकफूटवर गेलेली काँग्रेस आणि स्थानिक पक्ष कमबँक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आलेल्या कलांमध्ये पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये भाजपा आणि आसाम गण परिषद 9 जागांवर आघाडीवर आहेत. तर अरूणाचल प्रदेशमध्ये 2, मणिपूरमध्ये 1,  त्रिपुरामध्ये 2 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे. पूर्वोत्तर भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांचा समावेश होतो. पैकी एकट्या आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. तर उर्वरित सहा राज्यांत 11 जागा आहेत. पूर्वोत्तर भारतातील 25 जागा भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहेत. 

आसाम (14) 

आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. भाजपाने 2014 मध्ये 7 जागा जिंकून बाजी मारली होती. तर भाजपाच्या मतांमध्ये सुमारे 20 टक्के वाढ होऊन ती 36.5 टक्के झाली. तसेच काँग्रेसची मते सुमारे 4.5 टक्क्यांनी कमी होऊन त्यांना तीन जागा मिळाल्या होत्या.

अरुणाचल प्रदेश (2)

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. भाजपा आणि काँग्रेसने 2014 मध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र यावेळी भाजपाने दोन्ही जागा जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. आसाममध्ये भाजपाचे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री असून, त्यात बीपीएफ व एजीपी (आसाम गण परिषद) आहे.

मणिपूर (2)

मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. दोन निवडणुकींमध्ये या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले एन बिरेन सिंग मणिपुरमध्ये मुख्यमंत्री असले तरी सत्तेत एनपीपी, एनपीएफ व एलजेपी यांचा सहभाग आहे.

मिझोराम  (1)

मिझोराममध्ये लोकसभेची एक जागा आहे. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे झोरामथंगा मुख्यमंत्री असून, त्या सरकारमध्ये भाजपा आहे.

मेघालय (2) 

मेघालयमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने एक जागा तर स्थानिक पक्षाने एक जागा  जिंकली होती. मेघालयमध्ये एनपीपीचे कोनराड संगमा मुख्यमंत्री असून, त्या सरकारमध्ये भाजपा व अन्य तीन प्रादेशिक पक्ष आहेत. 

नागालँड (1) 

नागालँडमध्ये लोकसभेची एक जागा आहे. स्थानिक एनपीएफ या पक्षाला सलग दोन निवडणुकांमध्ये याआधी विजय मिळाला आहे. नागालँडमध्ये एनडीडीपीच्या नैफिऊ रिओ मुख्यमंत्री आहेत आणि सत्तेत भाजपा, जनता दल (संयुक्त) व नॅशनल पीपल्स फ्रंट (एनपीपी) आहे. 

सिक्कीम (1) 

सिक्कीममध्ये लोकसभेची एक जागा आहे. 2014 च्या निवडणुकीत ही जागा स्थानिक एसडीएफ या पक्षाला मिळाली होती. सिक्किममध्ये सिक्किम डेमॉक्रेटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग ही भाजपच्या नेडामध्ये आहेत.

त्रिपुरा (2) 

त्रिपुरामध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या जागा सीपीएमला मिळाल्या होत्या. त्रिपुरात भाजपाचे बिप्लब देव मुख्यमंत्री आहेत, पण त्या सरकारमध्येही आयपीएफटी हा पक्ष आहे.

 

टॅग्स :Assam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019Arunachal Pradesh Lok Sabha Election 2019अरुणाचल प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Manipur Lok Sabha Election 2019मणिपुर लोकसभा निवडणूक 2019Mizoram Lok Sabha Election 2019मिझोरम लोकसभा निवडणूक 2019Sikkim Lok Sabha Election 2019सिक्किम लोकसभा निवडणूक 2019Tripura Lok Sabha Election 2019त्रिपुरा लोकसभा निवडणूक निकाल 2019Meghalaya Lok Sabha Election 2019मेघालय लोकसभा निवडणूक 2019nagaland-pcनागालँड