शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जनादेश पवित्र, त्यात संशयाला जागा नसावी; ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांवर प्रणव मुखर्जींचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:11 IST

ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्समधून भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे आरोप केले. याबद्दल आज दिल्लीत 19 पक्षांची बैठकदेखील झाली. यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील चिंता व्यक्त केली. ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आयोगाची आहे, असं मुखर्जींनी म्हटलं आहे. ईव्हीएमच्या वाहतुकीत हलगर्जीपणा होत असल्याच्या घटना सकाळपासून समोर आल्या. त्याबद्दल मुखर्जींनी चिंता व्यक्त केली. 'आपल्या लोकशाहीच्या गाभ्यालाच आव्हान देणाऱ्या अशा प्रकारच्या शंकांना स्थान असता कामा नये. जनादेश पवित्र आहे आणि त्यात संशयाला कोणतीही जागा नसावी,' असं मुखर्जींनी त्यांच्या निवेदनात नमूद केलं आहे. ईव्हीएम सुरक्षित राखण्याची आणि सर्व शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचंदेखील त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.एक्झिट पोल्सचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांच्या गोटात अस्वस्थता आहे. आज दुपारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 19 विरोधी पक्षांची बैठक झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर विरोधक निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जाण्यासाठी रवाना झाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग