शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपदाची संधी मिळाल्यास आंबेडकर नगरमधून निवडणूक लढवणार : मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:25 IST

ज्या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, तिथे मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यावर मायावती म्हणाल्या की, नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत.

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान पदासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची संधी मिळाल्यास आपण आंबेडकर नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू शकतो, असं त्यांनी म्हटले आहे. मायावतीलोकसभा निवडणूक लढवत नसून पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्या आंबेडकर नगरमधील प्रचार सभेत बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीनंतर गरज भासल्यास आपण आंबेडकर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असं मायावती यांनी सांगितले. मात्र पंतप्रधानपदासाठी आपण इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. सर्वकाही ठीक झाले तरच मी इथून निवडणूक लढवणार आहे. कारण दिल्लीच्या राजकारणाचा मार्ग आंबेडकर नगरमधूनच जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, तिथे मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यावर मायावती म्हणाल्या की, नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच मायावती यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र निवडणुकीनंतर निकालाचे चित्र पाहून आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीambedkar-nagar-pcअंबेडकर नगर