शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Video - केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:58 IST

केरळच्या कोल्लममध्ये Left Democratic Front (LDF) आणि  United Democratic Front (UDF) च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देकेरळच्या कोल्लममध्ये LDF आणि UDF च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाली. दोन पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. मात्र नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

कोल्लम - केरळच्या कोल्लममध्ये Left Democratic Front (LDF) आणि  United Democratic Front (UDF) च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे. केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे  मंगळवारी (23 एप्रिल) पार पडणार आहे. या टप्प्यासाठी रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सारेच पक्ष शक्ती प्रदर्शन करत होते. केरळमध्ये देखील प्रचार सुरू होता. कोल्लम जिल्ह्यातील पुयाप्पल्ली येथे Left Democratic Front (LDF) आणि  United Democratic Front (UDF) या पक्षाचे कार्यकर्ते रोड शो दरम्यान एकमेकांसमोर आले.

दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. मात्र थोड्या वेळाने या वादाचे रुपांतर हे हाणामारीत झाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड-शो दरम्यान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील झेंड्याच्या काठीनेच एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. 

आंध्र प्रदेशामध्ये याआधी काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना समोर आली होती. अनंतपूरमधील ताडीपत्रीमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देशम पक्ष (टीडीपी) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका टीडीपी नेता एस. भास्कर रेड्डी यांचा मृत्यू झाला होता. तसेच, आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्यासह 10 जण जखमी झाले होते. याशिवाय, राज्यात अनेक ठिकाणी तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019