शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 11:35 IST

मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या.पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. 22 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यात घेण्यात आलेले मतदान 19 मे रोजी संपले. मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. 22 मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्यादिवशी फेरमतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे. 

22 मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या आधी तसेच मतदानाच्या दिवशी मोठा हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी अशा वादग्रस्त मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याविषयी गोयल यांची निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली झाली. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाण प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केल्याचं गोयल यांनी म्हटलं होतं. 

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी किरकोळ हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात मात्र हे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. तनरतारन येथे झालेल्या चकमकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकजण जखमी झाले होते. हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या प्रत्येक मतदानाच्या टप्प्यात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना समोर आल्या होत्या. 

सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली होती.

 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग