शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर बोट कापणाऱ्या युवकाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 11:13 IST

बुलंदशहरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. पवन कुमारने देखील याचवेळी मतदान केले. पवन कुमारने सांगितले की, मला माझं मन खात होतं. आपल मत व्यर्थ गेल्याची भावना माझ्या मनात होती. त्यामुळे पु्न्हा मतदान करण्याची माझी ईच्छा होती.

बुलंदशहर – उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मतदान करताना चुकीचं बटन दाबल्यामुळे एक युवकाने आपले बोट कापल्याचे वृत्त आले होते. आता त्या युवकाने मतदानानंतर बोट का कापले याचं खरं कारण समोर आले आहे. खुद्द युवकानेच बोट कापून घेण्यामागचा धक्कादायक खुलासा केला आहे. अब्दुल्लाहपूर हुलासन गावातील पवन कुमारने सांगितले की, मी हत्तीला अर्थात बसपला मतदान करण्यासाठी गेलो होते. परंतु, चुकून कमळाचे बटन दाबले गेले. त्यानंतर मी घरी येऊन बोट कापून घेतले. ज्या बोटावर मतदान केल्यानंतर शाई लावण्यात आली होती, तेच बोट पवनकुमारने कापून घेतले होते. देशात मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावण्यात येते. बुलंदशहरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. पवन कुमारने देखील याचवेळी मतदान केले. पवन कुमारने सांगितले की, मला माझं मन खात होतं. आपल मत व्यर्थ गेल्याची भावना माझ्या मनात होती. त्यामुळे पु्न्हा मतदान करण्याची माझी ईच्छा होती. त्यामुळेच मी मतदानाची शाई लागलेले बोट कापले. तसेच मी केवळ मायावती यांनाच मत देणार होतो. त्या आमच्या जातीच्या असल्याचे पवन कुमार पुढे म्हणाले. याआधी चुकीचे बटन दाबल्या गेल्यामुळे पवनने बोट कापल्याचे वृत्त होते. वास्तविक पाहता पवनला दुसऱ्यांदा मतदान करायचे होते, त्यामुळे त्याने बोट कापून घेतले होते.पवन कुमार यांचे बोट नखापासून वेगळे झाल्याचे सांगण्यात आले. पवनला त्याच्या भावाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात गेल्यामुळे मी पुन्हा मतदान करण्यासाठी जाऊ शकलो नाही, असंही पवन कुमारने सांगितले. सध्या पवन कुमारची स्थिती ठिक आहे. केवळ भावनेच्या भरात त्याने बोट कापून घेतल्याचे पवन कुमारच्या काकांनी सांगितले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीmayawatiमायावतीBJPभाजपा