शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

वडील-मुलीच्या नात्यात आचारसंहितेचा अडसर; कन्यादानाला मुकणार 100 कैदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 11:38 IST

निवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. जवळपास 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही. 

ठळक मुद्देनिवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही. आयोगाने राज्यातील सर्व कैद्यांना पॅरोल देण्यास मनाई केली आहे.

भोपाळ - लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मात्र निवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. जवळपास 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही. 

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे लग्न सराईची धामधूम आहे. निवडणुक आयोगाकडे निवडणुकीच्या काळातील प्रशासनासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार असतात. मात्र अशाच एका निर्णयाचा फटका हा तुरुंगातील कैद्यांना बसला आहे. कारण आयोगाने राज्यातील सर्व कैद्यांना पॅरोल देण्यास मनाई केली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे 100 कैद्यांना मुलांच्या लग्नासाठी जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलींचे कन्यादानही करता येणार नाही. 

भोपाळ सेंट्रल जेलमध्ये असे अनेक कैदी आहेत ज्यांना मुलांच्या लग्नासाठी जायचे आहे. यातीलच एक कैदी सलीम हे सध्या एका हत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. सलीम यांच्या मुलीचा विवाह 26 एप्रिल रोजी शाजापूर येथे होणार आहे. पण आयोगाच्या निर्णयामुळे त्याला आता सुट्टी मिळणार नाही. सलीम यांच्या प्रमाणेच आणखी काही कैदी आहेत ज्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता ते शक्य नाही.

तुरुंगातील सर्व कैद्यांना आधी तुरुंग प्रशासनाने पॅरोल मंजूर केला होता. पण आता आयोगाच्या आदेशामुळे तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या कैद्यांच्या मुलींचे लग्न आहे त्यांना कन्यादान कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 130 तुरुंग आहेत. या सर्व तुरुंगात मिळून 18 हजार कैदी आहेत. त्यापैकी 4 हजार जणांना प्रत्येक वर्षी पॅरोल दिला जातो. राज्यात असे एकूण 100 कैदी आहेत ज्यांना मुलाच्या अथवा मुलीच्या लग्नासाठी जायचे आहे. भोपाळ सेंट्रल जेलचे अधिक्षकांनी यांसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ज्या कैद्यांनी पॅरोलसाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज आयोगाकडे परवानगीसाठी पाठवण्यात आले आहेत. आयोगाने जर परवानगी दिली तर त्यांना सुट्टी दिली जाईल. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPrisonतुरुंगjailतुरुंग