शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षक दलाचे लोशाली बडतर्फ

By admin | Updated: December 15, 2015 04:46 IST

सरकारच्या भूमिकेविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मासेमारीच्या मिषाने गुजरात

 पाकिस्तानी जहाजावरील आत्मघात : वादग्रस्त वक्तव्य आले अंगलट

नवी दिल्ली : सरकारच्या भूमिकेविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मासेमारीच्या मिषाने गुजरात किनारपट्टीलगत भारतीय हद्दीत स्फोटकांच्या साठ्यासह शिरलेल्या संशयास्पद पाकिस्तानी नौकेला आत्मघाती स्फोटांनंतर मिळालेल्या जलसमाधी आणि बुडाल्याप्रकरणी शासकीय भूमिकेच्या विरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्य लोशाली यांना भोवले. चौकशी मंडळाने लोशाली यांना त्यांच्यावरील सर्व आरोपांबद्दल शनिवारी दोषी ठरविल्यावर बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला. ही मूळ घटना यंदाच्या नववर्षदिनाच्या पहाटेची. एका पाकिस्तानी नौकेला तटरक्षकांनी थरारक पाठलागानंतर घेरल्यानंतर नौकेवरील (मच्छीमार न वाटणाऱ्या) संशयितांनी आत्मघाती स्फोटांतून आग लावली असा सरकारचा दावा होता. पण लोशाली यांनी १५ फेब्रुवारीला तटरक्षक अधिकाऱ्यांशी बोलताना ३१ डिसेंबरच्या रात्री मी गांधीनगरला होतो आणि स्फोट घडवून जहाज उडविण्याचे आदेश मीच दिले होते कारण आम्हाला त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नव्हती,असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने सरकार आणि तटरक्षक दल अडचणीत आले होते.वरिष्ठ महानिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या एका पथकाने तीन महिने याप्रकरणाचा तपास केला. बोर्ड आॅफ इन्क्वायरीने तीन महिन्यांच्या तपासासोबत त्यांचे कोर्ट मार्शलही केले. या घटनेनंतर लोशाली यांना वायव्य क्षेत्र चीफ आॅफ स्टाफ पदावरून हटवून गांधीनगरातील क्षेत्रीय मुख्यालयात पाठविण्यात आले होते. काय घडले होते..स्फोटानंतर आगीत जळालेल्या या जहाजातील चारही जण मृत्युमुखी पडले. या जहाजावर स्फोटके होती व या संशयितांना अडविण्यात आल्यानंतर त्यांनी आत्मघात केला,असा दावा सरकारतर्फे करण्यात आला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून या पाकिस्तानी जहाजाचा संशयित दहशतवाद्यांशी संबंधांचे संकेत मिळाले असल्याचे म्हटले होते. जहाजावरील लोक दहशतवादी नव्हे तर केवळ तस्कर असल्याचा दावा फेटाळताना आणि ते पाकिस्तानी सागरी अधिकारी, लष्कर तसेच अन्य आंतरराष्ट्रीय लोकांच्या संपर्कात होते असेही त्यांनी स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)