कुलूप तोडून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
कुलूप तोडून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास
कुलूप तोडून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास
कुलूप तोडून ७० हजारांचा मुद्देमाल लंपासनागपूर : पोस्ट ऑफिसमध्ये गेलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ७० हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने लंपास केला. ही घटना प्रकाशनगरात मंगळवारी दुपारी १.३० ते ४.३० दरम्यान घडली. शशी योगेश मिश्रा (३१) रा. मुरलीधर को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकाशनगर या पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरुममधील लोखंडी आलमारीतून सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल, रोख तीन हजार असा एकूण ७० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.