शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News:आयटी कर्मचाऱ्यांवर कपातीचे संकट; ६ लाख कर्मचारी होणार बेरोजगार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:47 IST

हैदराबादमध्ये आयटी क्षेत्रात ६ लाख कर्मचारी आहेत. ते कोरोनामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत. छोट्या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

हैदराबाद : आयटी क्षेत्रातील लघु आणि मध्यम कंपन्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन तेलंगणा सरकारने केंद्र सरकारला केले आहे. टाळेबंदी, कपात यासारख्या परिस्थितीतून वाचण्यासाठी पर्याप्त मार्ग काढण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

तेलंगणाचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री के.टी. रामाराव यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांना याबाबत पत्र लिहिले आहे. यावरील काही उपायोजनाही त्यांनी सुचविल्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की, हैदराबादमध्ये आयटी क्षेत्रात ६ लाख कर्मचारी आहेत. ते कोरोनामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत. छोट्या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या पत्रात म्हटले आहे की, लघु व मध्यम कंपन्यांसाठी कर्जाची मर्यादा ५० टक्क्यांनी वाढवायला हवी. जेणेकरून या कंपन्या आपल्या कर्मचाºयांचे आगामी तीन ते चार महिन्यांचे वेतन करू शकतील. हे कर्ज चार महिन्यांपर्यंत व्याजमुक्त असायला हवे आणि परतफेडीसाठी कंपन्यांना किमान १२ महिन्यांचा कालावधी दिला जावा.

केंद्राने जीएसटीसंदर्भात काही सूट जाहीर केली होती. त्यानंतर बºयाच कंपन्यांनी पूर्ण टॅक्स भरला. त्यामुळे केंद्र सरकारने आता रिफंड त्वरित जारी करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.एच-१ बी व्हिसानंतर आता अमेरिकेचे टार्गेट ओपीटीएच-१ बी व्हिसानंतर आता अमेरिकेचे टार्गेट ओपीटी उच्चशिक्षण घेणाºया भारतीय विद्यार्थ्यांवर होऊ शकतो परिणामन्यूयॉर्क : एच-१ बी व्हिसानंतर आता अमेरिकेचे टार्गेट ओपीटी (आॅप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग) असणार आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून या उपाययोजना केल्या जाऊ शकतात. याचा थेट परिणाम उच्चशिक्षण घेणाºया भारतीय विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, डिपार्टमेंट आॅफ होमलॅण्ड सिक्युरिटीजचे प्रमुख चॅड वुल्फ यांनी म्हटले आहे की, ही संघटना टेम्पररी व्हिसा वर्कर्सची समीक्षा करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर ही कार्यवाही करण्यात येत आहे. कोरोनामुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढली असून, त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. अमेरिकेत २.५ कोटी बेरोजगारांचा प्रश्न उभा ठाकला आहे.काय आहे ओपीटी?अमेरिकेतील इमिग्रेशन सर्व्हिसेसने ओपीटीला टेम्पररी एम्प्लॉयमेंट म्हणजेच अस्थायी रोजगाराच्या स्वरूपात परिभाषित केले आहे. याचा उपयोग शिक्षणासाठी आलेले विदेशी विद्यार्थी करतात. ओपीटीचा कालावधी एक वर्षाचा असतो. जर विद्यार्थी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथचा विद्यार्थी असेल, तर त्याला २४ महिन्यांचा विस्तार कालावधी मिळू शकतो. या विषयांंच्या पदवीधारकाला तीन वर्षांचा अस्थायी रोजगार मिळतो. कंपन्यांनाही ही योजना फायद्याची आहे. त्यांना टॅक्समधून सवलत मिळते.भारतीय विद्यार्थ्यांना लाभ : भारतीय विद्यार्थी चीनसोबतच या योजनेचे मोेठे लाभार्थी आहेत. एका अहवालानुसार, अमेरिकेत २ लाख ५० हजार भारतीय पदवीधारक आहेत. २०१८ मध्ये ७० हजार भारतीयांना ओपीटीअंतर्गत जॉब मिळाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या