शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लॉकडाऊनचा परिणाम! नोकरी गमावली; डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकतोय केळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 19:13 IST

कोरोनाचा फटका बसल्यानं अनेक जण बेरोजगार झाले आहेत. तसेच अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे.

तेलंगणा: कोरोनाचा फैलाव जगभरात झाला असून, त्याचा भारतालाही मोठा फटका बसला आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. कोरोनाचा फटका बसल्यानं अनेक जण बेरोजगार झाले आहेत. तसेच अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. आंध्र प्रदेशमधल्या एका शिक्षकालाही कोरोनाच्या संकटापायी नोकरी गमवावी लागली आहे. तो आता रस्त्यावर केळी विकत आहे. ४३ वर्षीय सुब्बैया हे आंध्र प्रदेशातील नेल्लोरनगरचे रहिवासी आहेत.गेल्या १५ वर्षांपासून ते शिक्षकाची नोकरी करत आहेत. परंतु या कोरोनाच्या संकटात त्यांना नोकरी गमवावी लागली. डबल पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री असतानाही या शिक्षकाला केळी विकून उदरनिर्वाह करावा लागतो आहे. मार्चच्या अखेरपर्यंत सुब्बैया शिक्षक म्हणून नोकरी करून १६०८० रुपये कमावत होते. परंतु आता त्यांना एका अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी मुलाच्या उपचारासाठी ३ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, ते कर्जसुद्धा फेडावं लागत आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सुब्बैया यांनी बीएडबरोबरच राजकीय विज्ञान आणि तेलुगूमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. जेव्हा १५ वर्षांपूर्वी त्यांना शिक्षण म्हणून नोकरी मिळाली, तेव्हापासून त्यांनी स्वप्न पाहण्यास सुरुवात केली.लग्न होऊन दोन मुलंसुद्धा झाली. एका मुलाचं वय ६ वर्ष, तर दुसऱ्याचं वय पाच वर्षं आहे. एप्रिल आणि मेच्या पगारासाठी कॉलेज प्रशासनानं सर्वच शिक्षकांना एक टार्गेट दिलं होतं. पुढच्या वर्षांसाठी जास्तीत जास्त मुलांचं ऍडमिशन करून दिलं तरच त्यांना पगार मिळणार, अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. सर्वच शिक्षकांना १० नव्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून देण्यास सांगितलं होतं. पण कोरोनाच्या संकटापायी पालक मुलांचं ऍडमिशन करत नव्हते.अशातच ५० टक्के पगार देऊन सुब्बैया यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यांनी एका मित्राला आपली अडचण सांगितली, तर त्या मित्रानं त्यांना केळी विकण्याचा सल्ला दिला. तुमच्यासाठी केळ्याचा व्यापार ठीक आहे. कारण यात १००० रुपये गुंतवल्यानंतर दररोज २०० रुपयांची कमाई होते. त्यांनी मित्राचा सल्ला गांभीर्यानं घेतला आणि २० मेपासून केळी विकण्यास सुरुवात केली. आता हेच त्यांच्या कमाईचं साधन आहे. तसंही कोणतंही काम छोट नसतंच.

हेही वाचा

CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर

LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा

पाकच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दाखवला पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग, उडाली एकच खळबळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या