शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
3
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
4
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
5
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
6
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
7
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
8
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
9
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
10
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
11
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
12
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
13
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
14
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
15
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
16
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
17
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
18
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
19
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
20
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!

Lockdown 4.0: 12 राज्यांतील 30 शहरांमध्ये कडक लॉकडाऊन सुरूच राहणार; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:16 AM

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने शनिवारी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिका-यांसमवेत एक आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लादलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपुष्टात येत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने शनिवारी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिका-यांसमवेत एक आढावा बैठक घेतली. बैठकीत लॉकडाऊन 4.0वर चर्चा झाली. बैठकीत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात 30 जिल्हा व महापालिका क्षेत्रात कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे ठरवण्यात आले आहे.

नवी दिल्लीः देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे 3,000 नवीन रुग्ण समोर येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लादलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपुष्टात येत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने शनिवारी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिका-यांसमवेत एक आढावा बैठक घेतली. बैठकीत लॉकडाऊन 4.0वर चर्चा झाली.बैठकीत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात 30 जिल्हा व महापालिका क्षेत्रात कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे ठरवण्यात आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या आढावा बैठकीत या 30 जिल्ह्यांबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, या जिल्ह्यांमध्ये कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही जिल्ह्यांना सवलती दिल्या जाऊ शकतात, तर कोरोना हॉटस्पॉट भागात आणखी कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अतिसंक्रमित भागात हा साथीचा रोग टाळण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सरकारने निवडलेल्या 30 नगरपालिका क्षेत्रांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दलही माहिती देण्यात आली, त्यामध्ये संक्रमित रुग्णांची संख्या, दुप्पट दर आणि कोरोना चाचणीसंदर्भातही चर्चा झाली आहे. या राज्यांतील 30 जिल्ह्यांना मिळणार नाही सूटराज्य               शहर

महाराष्ट्र           मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, पालघर, सोलापूर आणि पुणे

गुजरात            बडोदरा, अहमदाबाद आणि सूरत

मध्य प्रदेश         भोपाळ आणि इंदुर

आंध्र प्रदेश        कुरनुल

तामिलनाडू         विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, अरियालुर, ग्रेटर चेन्नई आणि तिरुवल्लूर

राजस्थान          जयपूर, जोधपूर, उदयपूर

दिल्ली               जास्त करून  रेड झोन भाग

ओडिशा            बरहमपूर

पश्चिम बंगाल        हावड़ा आणि कोलकाता

तेलंगणा              ग्रेटर हैदराबाद

पंजाब                  अमृतसर

उत्तर प्रदेश           आग्रा आणि मेरठ

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊन 4च्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकार तयार, मिळू शकते 'या' सेवांना परवानगी

Coronavirus: प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही जिल्ह्यांतून श्रमिक एक्सप्रेस चालवण्यास तयार, रेल्वेची मोठी घोषणा

Coronavirus: मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज- नितीन गडकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस