शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तीन टप्प्यांत देश होणार Unlock; जाणून घ्या काय असतील नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 06:23 IST

या कालावधीत दररोज रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या हालचाली बंद करण्यात येतील.

नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आले असून यामध्ये तीन टप्प्यांत सूट देण्य़ात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे. 

 

पहिला टप्पा : खालील व्यवहार ८ जूननंतर सुरू होतील-१) धार्मिक स्थळे/पूजा स्थळे सर्वांसाठी खुली होतील.२) हॉटेल्स, रेस्टॉरंटस् व इतर आदरातिथ्य सेवा.३) शॉपिंग मॉल्स.हे सर्व सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय काही मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. त्यासाठी केंद्राची मंत्रालये/विभाग व इतर संबंधितांशी चर्चा करण्यात येणार आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून कोरोना रोखण्यास प्राधान्य राहील.

दुसरा टप्पा : शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक /प्रशिक्षण/कोचिंग संस्था, राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर सुरू केली जातील. यासाठी राज्य सरकारे संस्था, पालक व इतर संबंधितांशी संपर्क साधून चर्चा करू शकतात. त्यांनी दिलेल्या माहितीवरून जुलैमध्ये या संस्था पुन्हा उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबत मंत्रालय मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. तेथेही फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरच कोरोना रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.

तिसरा टप्पा : स्थितीचा आढावा घेतल्यानंतर खालील व्यवहार सुरू करण्याच्या तारखा पुन्हा ठरविण्यात येणार आहेत.१) आंतरराष्टÑीय हवाई प्रवासी वाहतूक. २) मेट्रो रेल्वे.३) सिनेमा हॉल, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स, बार व आॅडिटोरियम, हॉल व तत्सम जागा.४) सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/अकॅडेमिक/ सांस्कृतिक/धार्मिक समारंभ व इतर गर्दीचे समारंभ.

1. लॉकडाऊन ३० जूनपर्यंत फक्त कंटेन्मेंट झोनपुरता मर्यादित राहील.2. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन कंटेन्मेंट झोन निश्चित करील.3. कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक घडामोडी चालू राहतील. या भागातून बाहेर जाण्यास व बाहेरून आत जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. यातून वैद्यकीय, जीवनावश्यक वस्तू व सेवांना सूट देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये प्रत्येक घरावर नजर असेल, कोण-कोणाच्या संपर्कात येत आहे, यावरही नजर असेल.4. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर बफर झोन ठरविण्याचे अधिकारही राज्यांना देण्यात आले आहेत. जेथे नवीन रुग्ण वाढू शकतात, त्या भागांमध्ये आवश्यक ते निर्बंध घालण्यात येणार आहेत.

रात्रीची संचारबंदी : या कालावधीत दररोज रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या हालचाली बंद करण्यात येतील. जीवनावश्यक बाबींना यातून वगळण्यात आले आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने आदेश जारी करायचे आहेत, तसेच याची अंमलबजावणी कडकपणे करायची आहे.

व्यक्ती व मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत1. व्यक्ती किंवा मालाची राज्यांतर्गत किंवा राज्याबाहेर वाहतूक करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी/मंजुरी/ई-परमिट घेण्याची गरज नाही.2. तथापि, राज्य सरकारे सार्वजनिक आरोग्य व त्यांच्या आढाव्यानुसार, ही वाहतूक नियंत्रित करू शकतात. त्यासाठी त्यांनी त्या नियमांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्यावी.3. पॅसेंजर ट्रेन, श्रमिक विशेष रेल्वे, देशांतर्गत प्रवासी हवाई वाहतूक, देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरिक व देशाबाहेर प्रवास करणारे विशेष व्यक्ती, परकीय नागरिकांची वाहतूक ही मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सुरू राहील.4. कोणतेही राज्य कोणत्याही प्रकारच्या वस्तू व मालाची वाहतूक राज्यात व राज्याबाहेर रोखू शकणार नाही.यांना घरीचथांबण्याची सूचना६५ वर्षांवरील व्यक्ती, आजारी, गर्भवती महिला, १० वर्षांखालील बालके यांना घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यंत गरजेच्या किंवा वैद्यकीय कारणासाठीच त्यांनी बाहेर पडावे, असेही म्हटले आहे.

मास्क : सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक आहे.फिजिकल डिस्टन्सिंग : सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने इतरांपासून किमान ६ फुटांचे अंतर राखले पाहिजे. दुकानदाराने ग्राहकांसाठी हा नियम घालून द्यावा व एका वेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक असता कामा नये.समारंभ : मोठ्या गर्दीचे समारंभ/कार्यक्रम यावरील बंदी कायम राहील. विवाहासाठी ५० पेक्षा अधिक लोकांना हजर राहण्याची परवानगी असणार नाही. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा अधिक लोकांना हजर राहण्याची परवानगी नाही.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू इत्यादीचे सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे.वर्क फ्रॉम होम : शक्यतो सर्वांनी वर्क फ्रॉम होम करावे.स्क्रीनिंग व हायजिन : प्रवेश करतेवेळी व बाहेर जातेवेळी थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश व सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे.वारंवार सॅनिटायझेशन : कामाच्या संपूर्ण ठिकाणी आणि जो भाग वारंवार सर्वांच्या संपर्कात येतो तिथे प्रत्येक शिफ्टच्या मध्ये सॅनिटायझेशन केले पाहिजे.डिस्टन्सिंग : कामाच्या ठिकाणी सर्वांनी एकमेकांपासून डिस्टन्सिंग पाळले पाहिजे. विशेषत: दोन शिफ्टमधील वेळ, लंच ब्रेक आदी वेळी हे पाळले जावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार