शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर मेडिकल प्रवेशांतील स्थानिक वास्तव्याची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:26 IST

राज्यातील सरकारी, महापालिकांच्या आणि खासगी अनुदानित वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये राज्य कोट्याच्या ५० टक्के जागांसाठी महाराष्ट्रातील वास्तव्याची अट लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही बुधवारी बेकायदा ठरवून रद्द केला.

- विशेष प्रतिनिधीनवी दिल्ली - राज्यातील सरकारी, महापालिकांच्या आणि खासगी अनुदानित वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये राज्य कोट्याच्या ५० टक्के जागांसाठी महाराष्ट्रातील वास्तव्याची अट लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही बुधवारी बेकायदा ठरवून रद्द केला.या जागांवर प्रवेशासाठी महाराष्ट्राचे निवासी असलेले (डोमिसाइल) उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील, असा नियम प्रवेश प्राधिकरणाने २९ व ३० जानेवारीच्या अधिसूचनांद्वारे जाहीर केला होता. राज्यात पदव्युत्तर वैद्यकीय पदवीच्या १,६३९ तर पदविकेच्या २८९ जागा आहेत.राज्यातून एमबीबीएस झालेल्या परंतु इथे कायम वास्तव्य नसलेल्या डॉक्टरांनी याविरुद्ध हायकोर्टात याचिका केली होती. गेल्या २२ फेब्रुवारी रोजी न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करीत ‘डोमिसाइल’चा नियम रद्द केला होता. अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी म्हणाले होते की, पदव्युत्तर प्रवेशातील ५० टक्के जागा राष्ट्रीय व ५० टक्के जागा राज्य कोट्याच्या असतात. राष्ट्रीय कोट्यासाठी देशभरातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. ते येथे शिक्षण घेऊन परराज्यांत व्यवसाय करतात. त्यांच्या शिक्षणावर राज्य खर्च करते पण त्यांच्या सेवांचा राज्याला लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्य कोट्यातील प्रवेश राज्यात स्थायिकांनाच मिळावेत या हेतूने हा नियम केला आहे. परंतु हे म्हणणे अमान्य करीत खंडपीठाने म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप जैन (१९८४) व विशाल गोयल (२०१४) या प्रकरणांत दिलेले निकाल इतके स्पष्ट आहेत की, राज्याचे हे म्हणणे विचारातही घेतले जाऊ शकत नाही.गेल्या वर्षीही राज्याने असा नियम केला होता व डॉ. गंगादीप माही व इतरांच्या याचिकेवर हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली होती. एका वर्षी नियमाला स्थगिती व दुसऱ्या वर्षी तो रद्द केला गेला तरी राज्य सरकारने हट्ट न सोडता सुप्रीम कोर्टात अपील केले. न्या. अरुण मिश्रा व न्या. उदय उमेश लळित यांच्या खंडपीठाने एका ओळीचा आदेश देत ते फेटाळले. या खटल्यात राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तर मूळ याचिकाकर्त्यांसाठी ज्येष्ठ वकील श्याम दिवाण व अ‍ॅड. पूजा थोरात यांनी काम पाहिले.कर्नाटकचाही नियम रद्दशेजारच्या कर्नाटक राज्यानेही तेथील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमधील ५० टक्के राज्य कोट्यासाठी असाच नियम २०१४ मध्ये केला. कोर्टाकडून तो बेकायदा ठरवून रद्द केला गेला. त्या वर्षी पुन्हा तसाच नियम केला गेला. त्याविरुद्ध ४४ डॉक्टर-विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. न्या. मिस्रा व न्या. लळित यांच्याच खंडपीठाने कर्नाटकचा नियमही रद्द केला.

टॅग्स :Medicalवैद्यकीयdocterडॉक्टरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र