शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते निर्मितीत विक्रम करणारे गडकरी स्वपक्षीय नेत्यामुळेच अडचणीत येतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:24 IST

नितीन गडकरी म्हणाले, टोलवसुली ३.३ टक्क्यांनी वाढली

- हरीश गुप्तानवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी हे देशात महामार्ग बांधण्याबाबत विक्रम घडवीत असल्यामुळे चर्चेत असतात. मात्र, राज्यसभेत गडकरी त्यांच्याच पक्षाचे सदस्य सुशीलकुमार मोदी यांच्यामुळे अडचणीत आले.बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावरील (एनएचएआय) कर्ज मार्च २०२१ मध्ये ३.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले का, असे विचारले होते. मार्च २०१७ मध्ये हेच कर्ज ७३,३८५ कोटी रुपये होते. या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, हे कर्ज मार्च २०२० मध्ये २.४९ लाख कोटी होते, ते आता ३.०७ लाख कोटी रुपये झाले आहे. एनएचएआयकडील एकूण कर्ज मार्च २०१७ मध्ये ७४,७४२ कोटी होते, ते मार्च २०२१ मध्ये ३.०६,७०४ कोटी झाले आहे. २०१७ पासून एनएचएआयने बाहेरून तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.सुशीलकुमार मोदी म्हणाले की, एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ यादरम्यान टोलवसुली चार टक्क्यांनी वाढून सुमारे २६ हजार कोटी झाली का, यावर गडकरी टोलवसुली साधारणपणे ३.३ टक्के वाढली, असे म्हणाले. रस्ते ही संपत्ती : एनएचएआय रस्ते ही बहुमूल्य संपत्ती निर्माण करीत आहे. २०१७ पासून प्राधिकरणने सार्वजनिक पैशांतून १७,०४२ कि.मी. रस्ते बांधले असून, सुमारे ४.०८ लाख काेटी रुपये खर्च झाला. सार्वजनिक पैशांतून बांधकाम झालेल्या रस्त्यांना टोल लावला आहे. २०१७ पासून एनएचएआयने ७४,३३७ कोटी रुपये कर्जफेड केली आहे, असेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी