शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जावरील मोरॅटोरिअमला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; पुढील सुनावणीला ठोस निर्णयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 06:38 IST

सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : हप्ते थकलेली खाती एनपीएमध्ये न टाकण्याचा आपला आदेश पुढील सुनावणीपर्यंत कायम राहील, असे सांगून सर्वोच्च न्यायलयाने कर्ज मोरॅटोरिअमला (हप्ते न भरण्याची सवलत) २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना कर्जांचे हप्ते न भरण्याची म्हणजेच मोरॅटोरिअमची सवलत देण्यात आली होती. या मोरॅटोरिअमची मुदत ३१ आॅगस्टला संपली आहे. सहा महिन्यांसाठी ही सवलत कर्जदारांना मिळालेली होती. मोरॅटोरिअमच्या कालावधीतील व्याजावर व्याज लावण्यात येऊ नये तसेच कर्जदाराचे मानांकन घटविण्यात येऊ नये, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. या मागण्यांवर सरकारने विचार करावा, असे न्यायालयाने सरकारला सांगितलेले आहे.

कोविड-१९च्या परिणामानुसार कर्ज मोरॅटोरिअम २ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो, असे सरकारने सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच सांगितले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला सांगितले की, या मुद्द्यावर रिझर्व्ह बँक आणि सर्व कर्जदाते यांच्याशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करा आणि ठोस निर्णय घेऊनच न्यायालयात या. त्यानंतर न्यायालयाने मोरॅटोरिअमला २८ तारखेपर्यंत मुदतवाढ दिली.

केंद्र सरकारने ठोस भूमिका घेण्याची मागणी

च्कर्जदारांच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. राजीव दत्ता यांनी सांगितले की, थकीत कर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जात आहे. मग मोरॅटोरिअमची सवलत कुठे आहे? कर्जांची पुनर्रचना आता केली जात आहे. ती आधीच केली जायला हवी होती. च्लाखो लोक रुग्णालयात आहेत. लाखो लोकांनी उत्पन्नाचे सर्व स्रोत गमावले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यायला हवी. मोरॅटोरिअम आणि त्या काळातील व्याज माफ करण्याचा निर्णय घ्यायला हवा.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय