शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’ आता जगण्याचा भाग; अलाहाबाद हायकोर्टाचे भिन्न धर्मीय जोडप्याच्या याचिकेवर निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 07:48 IST

Allahabad High Court : कलम २१ अंतर्गत जगण्याचा हक्क हा कोणतीही किंमत मोजून जतन करणे बंधनकारक आहे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

प्रयागराज : ‘लिव्ह इन रिलेशनशिप्स’ आता जगण्याचा भाग झाला असून त्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिलेली आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती प्रिटिंकर दिवाकर आणि आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप्सकडे समाजाच्या नैतिकतेच्या कल्पना काय आहेत याऐवजी भारतीय घटनेचे कलम २१ अंतर्गत निर्माण झालेल्या जगण्याच्या हक्काच्या मिळालेल्या  वैयक्तिक स्वातंत्र्याच्या चश्म्यातून बघणे आवश्यक आहे.’ कलम २१ अंतर्गत जगण्याचा हक्क हा कोणतीही किंमत मोजून जतन करणे बंधनकारक आहे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या दोन वेगवेगळ्या धर्मांच्या जोडप्याने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना वरील निरीक्षण नोंदवले. या जोडप्यातील महिलेच्या नातेवाइकांकडून आमच्या जीविताला धोका असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. ही याचिका शायरा खातून आणि त्यांच्या सोबत्याने केलेली असून दोघेही सज्ञान आहेत. हे दोघे दोनपेक्षा जास्त वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांच्या दैनंदिन जगण्यात शायरा खातून यांचे वडील हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला आहे.

हक्कांचे संरक्षण पोलिसांना बंधनकारक या जोडप्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला होता. परंतु, पोलिसांनी त्यांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांचे जीवित आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, असे सांगण्यात आले. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे पोलिसांना बंधनकारक आहे. याचिकाकर्ते पोलिसांकडे आमच्या जीविताला व स्वातंत्र्याला धोका असल्याची तक्रार घेऊन भेटले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायद्यानुसार त्यांनी जे कर्तव्य पार पाडायचे आहे ते केले पाहिजे, असे आदेश देत न्यायालयाने याचिका निकाली काढली. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrelationshipरिलेशनशिप