नाशिक- वाळु ठिय्यांचे लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ई टेंडरींगच्या केलेल्या व्यवस्थेमुळे पारदर्शकता येण्याऐवजी अल्प प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने १७ ठिकाणच्या लिलावांसाठी निविदा मागविल्या असताना प्रत्यक्षात दोन ठिकाणीच देकार प्राप्त झाले आहे. जिल्हा प्रशासनाने गुरूवारी ई टेंडरींगची तपासणी केली असता केवळ जाखोरी आणि पळसे या दोन ठिकाणीच निश्चित सरकारी दरापेक्षा अधिक दर प्राप्त झाले आहेत. त्यात पळसे येथे ठिय्यासाठी ४ लाख ९४ हजार रूपयांची बोलीची किमान रक्कम ठरवली होती परंतु ५ लाख ५ हजार रूपयांचा देकार प्राप्त झाला आहे. तर जाखोरी येथे ७ लाख ४० हजार ४१० रूपये किंमत असताना प्रत्यक्षात मात्र ७ लाख ५१ हजार रूपयांचा देकार प्राप्त झाला आहे.
वाळू ठिय्यांना अल्प प्रतिसाद
By admin | Updated: January 23, 2015 01:25 IST