शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भारतातील २४ बोगस विद्यापीठांची नावे जाहीर, महाराष्ट्रातील एका विद्यापिठाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 18:23 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील २४ बोगस विद्यापीठांची नावे जाहीर केली आहेत. कोणतीही पदवी देण्याचा अधिकार या विद्यापीठांना नाही.

पणजी : विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील २४ बोगस विद्यापीठांची नावे जाहीर केली आहेत. कोणतीही पदवी देण्याचा अधिकार या विद्यापीठांना नाही. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आठ विद्यापीठे बोगस आढळली असून त्यानंतर दिल्लीचा (सात) क्रमांक लागतो.  वरील सर्व  विद्यापीठे स्वयंघोषित असून त्यांना अधिमान्यता नाही. विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टिने आयोगाने ही माहिती जाहीर केली आहे. शेजारी महाराष्ट्रात नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठ तसेच कर्नाटकात गोकाक येथील सरकार खुले विद्यापीठ बोगस असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय बिहारमध्ये दरभंगा येथील मैथिली विद्यापीठ, दिल्लीतील कमर्शियल युनिव्हर्सिटी, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक ज्युरीडीकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीयरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी आणि आध्यात्मिक विश्वविद्यालय ही सात विद्यापीठे बोगस जाहीर करण्यात आली आहेत. केरळमधील सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, पश्चिम बंगालमधील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ आॅल्टरनेटिव्ह मेडिसीन, इन्स्टिटयुट आॅफ आॅल्टरनेटिव्ह मेडिसीन अ‍ॅण्ड रीसर्च ही दोन विद्यापीठे बोगस ठरविण्यात आली आहेत. 

उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक 

उत्तरप्रदेशमधील वारानस्या संस्कृत विश्वविद्यालय, महिला ग्राम विद्यापीठ, गांधी हिन्दी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ इलेक्ट्रोकॉम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, इंद्रप्रस्थ शिक्षण परिषद ही आठ विद्यापीठे बोगस असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ओडिशात नवभारत शिक्षण परिषद, उत्तर ओरिसा कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पाँडिचरी येथील श्री बोधी अ‍ॅकेडमी आॅफ हायर एज्युकेशन हे विद्यापीठ बोगस जाहीर केले आहे. 

दरम्यान लखनौ येथील भारतीय शिक्षा परिषद विद्यापीठाच्याबाबतीत प्रकरण तेथील जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. १९५६ च्या विद्यापीठ अनुदान आयोग कायद्याच्या कलम २२ (१) नुसार केंद्र, राज्य सरकारची अधिमान्यता विद्यापीठांना आवश्यक आहे.