शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

देशभरातील 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर; आसाराम,राधे मां, राम रहिमची नावं यादीत, वाचा कोण आहेत 14 ढोंगी बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 2:16 PM

देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे, अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता बैठक झाली, बैठकीनंतर 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली. 

अलाहाबाद, दि. 10 - अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. रविवारी अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर देशातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली.  अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक झाली.  बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली. 

जीवे मारण्याची धमकी- या बैठकीच्या आधी परिषदेचे अध्यक्ष  महंत नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.बैठकीत त्यांनी फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी येत असल्याचं सांगितलं. गेल्या तीन दिवसांपासून धमकी येत असल्याचं ते म्हणाले. धमकी देणा-याने आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगितलं असं ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संत उपाधी देण्याबाबतही निर्णय-यावेळी अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने  'संत' उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन त्याचं आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे. याद्वारे  गुरमीत राम रहीम सारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल.  विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे संत उपाधी देणयाआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे.    सरकारला पाठवणार यादी-  या ढोंगी बाबांची यादी सरकारला पाठवणार असल्याची माहिती आहे. जेणेकरून अशा ढोंगी बाबांविरोधात कारवाई केली जावी असा त्या मागचा उद्देश आहे.  दरम्यान या बैठकीपूर्वी नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. बैठकीपूर्वी एक दिवस फोनवरुन ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारा व्यक्ती आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगत आहे. 

हे आहेत ढोंगी बाब- - आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी

- सुखबिंदर कौर उर्फ राधे मां

-सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता

- गुरमीत राम रहीम सिंह

-ओमबाबा उर्फ विवेकानंद झा

-निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह

- रामपाल

-आचार्य कुशमुनि

-वृहस्पति गिरी

-मलखान सिंह 

-इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी

-स्वामी असीमानंद

-ओम नमः शिवाय बाबा

-नारायण साईं