जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी GOAT इंडिया टूर २०२५ च्या पहिल्या टप्प्यात कोलकाता येथे पोहोचला. शनिवारी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये कार्यक्रम होता. पण जेव्हा चाहत्यांना येथे मेस्सीची झलक दिसली नाही, तेव्हा ते संतप्त झाले. स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बाटल्या फेकण्यात आल्या, पोस्टर फाडण्यात आले.
मेस्सी ५ ते १० मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. यामुळे संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड केली. स्टेडियमबाहेर उपस्थित असलेल्या मेस्सीच्या एका चाहत्याने सांगितलं, "एकदम वाईट कार्यक्रम होता, १० मिनिटांसाठी आला. सगळे नेते, मंत्री, कॉर्पोरेट अधिकारी त्याला घेरून उभे राहिले, आम्हाला काहीच पाहता आले नाही. शाहरुख खानही आला नाही. मेस्सी आला पण फ्रॉड करून निघून गेला. लोकांच्या भावनांशी खेळला, वेळ वाया घालवला, पैसे वाया गेले. काहीच पाहता आलं नाही."
मेस्सीच्या दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं की, "मेस्सी जवळ खूप गर्दी होती, असं वाटलं होतं की तो बॉलसोबत काहीतरी करेल, बॉलला स्पर्श करेल, पेनल्टी शूट आउट किंवा पेनल्टी किकसारखे काहीतरी होईल. पण तो फक्त आला, पाहिलं आणि निघून गेला. याला फ्रॉड म्हणण्याशिवाय दुसरं काही म्हणू शकत नाही." संतप्त जमावाने खुर्च्या तोडल्या आणि बाटल्या फेकल्या, ज्यामुळे कार्यक्रम मधेच थांबवावा लागला.
Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
एका मेस्सी चाहत्याने सांगितलं, "काय करणार? ५०० लोकांनी मेस्सीला घेरलं होतं, त्यांच्यात नेते आणि अभिनेते सगळे होते. आम्ही १२ हजार रुपयांचं तिकीट काढून मेस्सीला पाहण्यासाठी आलो होतो पण पाहू शकलो नाही." महागडी तिकीटं घेतलेल्या चाहत्यांनी मिसमॅनेजमेंट आणि नेत्यांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
"मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या मिसमॅनेजमेंटवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्या स्वतः हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसोबत त्यांचा आवडता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या, परंतु तिथे जो गोंधळ दिसला, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.
Web Summary : Lionel Messi's brief Kolkata appearance sparked outrage. Fans, who paid for tickets, felt cheated as leaders surrounded Messi. Disappointed attendees protested, leading to stadium disruptions and prompting apologies for mismanagement.
Web Summary : कोलकाता में लियोनेल मेस्सी की संक्षिप्त उपस्थिति से आक्रोश फैल गया। टिकट खरीदने वाले प्रशंसकों को ठगा हुआ महसूस हुआ क्योंकि नेता मेस्सी से घिरे थे। निराश दर्शकों ने विरोध किया, जिससे स्टेडियम में व्यवधान हुआ और कुप्रबंधन के लिए माफी मांगी गई।