जन्मठेप रद्द
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्या प्रकरणातील आरोपीची जन्मठेप रद्द केली आहे.
जन्मठेप रद्द
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्या प्रकरणातील आरोपीची जन्मठेप रद्द केली आहे. राजेश ऊर्फ बिशव फुलबहादूर थापा (४३) असे आरोपीचे नाव असून तो नेपाळ येथील मूळ रहिवासी आहे. मृताचे नाव नीलेश होते. आरोपी व नीलेश नागपूर येथे एकाच कंपनीत सुरक्षा रक्षक होते. कामावर उशिरा येणे व रात्री झोपण्यावरून त्यांच्यात वाद होता. यामुळे २२ फेब्रुवारी २०११ रोजी मध्यरात्रीनंतर आरोपीने नीलेशची हत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे होते. सत्र न्यायालयाने ३१ मे २०१२ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप सुनावली होती. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.