शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी  लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितची आज होऊ शकते सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 21:25 IST

लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एनआयए कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.

ठाणे, दि. 22 -  लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एनआयए कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तळोजा कोर्टातून आज प्रसाद पुरोहित यांची सुटका होऊ शकते. मालेगाव येथे सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितना सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अखेर जामीन मंजूर केला.

एटीएस विशेष न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने ते मंजूर करून एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. न्यायालयात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, साक्षी-पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करणे, पासपोर्ट जमा करणे व पूर्वानुमतीशिवाय देश सोडून बाहेर न जाणे अशा अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला. 

खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत पुरोहित निलंबितच राहतील, पण आता जामीन मिळाल्याने, त्यांना लष्कराच्या एखाद्या आस्थापनेशी औपचारिकपणे ‘अटॅच’ केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

या कारणांमुळे पुरोहित ‘बाहेर’एनआयएने सादर केलेले पुरवणी आरोपपत्र आणि महाराष्ट्र एटीएसने दाखल केलेले मूळ आरोपपत्र यातील तफावत, खटला लवकर संपण्याची शक्यता नसणे आणि पुरोहित यांचे आठ वर्षे आठ महिने तुरुंगात असणे या बाबी जामीन देताना न्यायालयाने नमूद केल्या. तपासी यंत्रणेला तपास करण्याचा अधिकार असला तरी आरोपीच्या स्वातंत्र्याचा एका मर्यादेपलीकडे अनाठायी संकोच केला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.

मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत आस्ते धोरण स्वीकारा, असे आपणास सांगण्यात आल्याची तक्रार काही काळापूर्वी सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनी केली होती. त्यानंतर त्या या खटल्यातून बाहेर पडल्या होत्या.

जामीन मिळताच तळोजा कारागृहासमोर गर्दीतळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांची सुटका होणार असल्याची माहिती मिळताच दुपारी एकपासून प्रसार माध्यम आणि नागरिकांनी कारागृहासमोर गर्दी केली होती. दस्तावेजाची पूर्तता न झाल्याने पुरोहित यांची सुटका एक दिवस लांबली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय