शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसीच्या विभागीय व्यवस्थापकांची परिषद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 04:44 IST

या परिषदेत एलआयसीच्या देशभरातील ११३ विभागांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.

मुंबई : आगामी वर्षातील व्यापाराची ध्येय धोरणे तसेच कॉर्पोेरेट रणनीती निश्चित करण्यासाठी एलआयसीच्या विभागीय व्यवस्थापकांची दोन दिवसांची परिषद मुंबईत २० ते २२ मे रोजी पार पडली.या परिषदेत एलआयसीच्या देशभरातील ११३ विभागांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. एलआयसीच्या आठ झोनचे प्रमुख, विविध विभागांचे आॅपरेशल हेडस, कॉर्पोरेट कार्यालयातील कार्यकारी संचालक आदींही यात सहभागी झाले. एलआयसीचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांच्या परिषदेत ध्येय धोरणे, रणनीती आखण्यासाठी गटचर्चा, त्यानुसार वर्षभर आखावयाचे विविध उपक्रम यावर सविस्तर विचारविनिमय करण्यासाठी विविध सत्रे घेण्यात आली. परिषदेत विपणन, ग्राहकसेवा, माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर वर्षभराची रणनीती निश्चित करण्यात आली.एकूण विमा पॉलिसीच्या विचार करता एलआयसीकडे सध्या बाजारातील ७४.७१ टक्के वाटा आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रिमियमच्या स्वरुपात एलआयसीला १,४२,१९१ कोटी मिळाले. ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांची यशस्वी पूर्तता करण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणे अभिमानास्पद राहिले आहे. या परिषदेत परिषदेत २०१८ -१९ वर्षात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.२२ मे रोजी परिषदेला आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राकेश शर्मा यांना प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांनी येत्या काळात एलआयसी देशभरातील कार्यालये आणि बँकेची आऊटलेट यांच्या माध्यमातून कशा उत्तम सेवा देता येतील, यावर मत मांडले. (वा. प्र)