शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या काळात ‘लायसन्सिंग राज’ला आळा- डॉ. सायरस पूनावाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 09:00 IST

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे : “लसींसाठी परवानग्या मिळवताना पूर्वी खूप त्रास व्हायचा आणि वेळही लागायचा. मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स राज’ला आळा बसला आहे. कोविशिल्ड लसीला तातडीने परवानगी मिळाल्याने उत्पादन वेगाने करणे शक्य झाले” असे प्रतिपादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केले.  लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने शुक्रवारी गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक मंदिरचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक या वेळी उपस्थित होते. डॉ. पूनावाला म्हणाले, “लोकमान्य टिळक हे द्रष्टे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार घेताना खूप आनंद होत आहे. सन १८८९ मध्ये लोकमान्य टिळक यांनी लस उत्पादनाचे मोठे केंद्र पुण्यात व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे स्वप्न ‘सिरम’च्या रूपात साकार झाले. सन १९६६ मध्ये सुरू झालेली छोटी कंपनी ते जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारी कंपनी हा प्रवास अभिमानाचा आहे. मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करतो.” सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘मेरे बहाद्दर’ असे म्हणत लोकमान्य टिळकांनी सायरस पूनावाला यांना मिठी मारली असती. “ज्ञानाची जिज्ञासा, अपार मेहनत यांचे फळ म्हणजे पूनावाला यांचे आजचे यश आहे.  पुणे हे संशोधनाचे माहेरघर होय, हे पूनावाला यांनी दाखवून दिले.