शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसी खरेच आर्थिक संकटात आहे का? जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:40 IST

Life Insurance Corporation (LIC) : एलआयसीमध्ये देशातील जवळपास प्रत्येकाची पॉलिसी आहे. बाजारात मंदी असल्याने हा पैसा बुडाल्याचे वृत्त पसरले होते.

देशाची सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसी तोट्यात असल्याने लाखो पॉलिसीधारकांचे पैसे असुरक्षित असल्याचा मॅसेज सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. यामुळे पॉलिसीधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पीएमसी बँकेवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती आहे. त्यातच आर्थिक मंदीमुळे देशातील मोठमोठ्या कंपन्यांना काम बंद ठेवावे लागत आहे. यामुळे एलआयसीने त्यामध्ये गुंतवलेला पैसा बुडाल्याचा मॅसेज फिरत आहे. 

एलआयसीमध्ये देशातील जवळपास प्रत्येकाची पॉलिसी आहे. सरकारी गुंतवणूकदार कंपनी आयएल अँड एफएस दिवाळखोरीत निघाली आहे. यामध्येही एलआयसीने पैसे गुंतविले होते. तसेच अन्य काही कंपन्यांमध्ये एलआयसी पॉलिसीधारकांचा पैसा गुंतवत असते. बाजारात मंदी असल्याने हा पैसा बुडाल्याचे वृत्त पसरले होते. एलआयसीने यावर खुलासा केला आहे. 

ग्राहकांचा पैसा बुडालेला नसून आम्ही या वृत्ताचे खंडन करतो, असे एलआयसीने स्पष्ट केले आहे. काही समाजकंटकांकडून एलआयसी आर्थिक संकटात असल्याची अफवा पसरविण्यात येत असून ग्राहकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एलआयसीने केले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात पॉलिसीधारकांना एलआयसीने आतापर्यंतचा सर्वाधिक 50000 कोटींचा बोनस दिला आहे. एलआयसीचा मार्केट शेअर मार्चमधील 66.24 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 73.06 टक्क्यांवर गेला होता. 

एलआयसीने काही हजार कोटींचा पैसा अनेक कंपन्यांमध्ये गुंतवला ज्या कंपन्यांचा शेअर गुंवणूक किंमतीपेक्षा कमी आहे, अशी अफवा पसरली होती.

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीMONEYपैसाshare marketशेअर बाजारLIC square Nagpurएलआयसी चौक, नागपूर